Health: 'हे' आहेत HIV AIDSचे Warning Signs, लक्षणे ओळखून वेळीच व्हा सावध

लागण होण्याआधीच तुम्हाला ही लक्षणे माहिती असतील तर होईल फायदा
HIV AIDS Symptoms
HIV AIDS Symptomsesakal

HIV AIDS Early Symptoms: HIV हा एक असा व्हायरस आहे ज्यामुळे तुमच्या इम्यून सिस्टमला धोका पोहोचतो. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांत या रोगावर उपचार केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतो. कारण हा आजार योग्य उपचार न केल्यास सीडी ४ पेशींपर्यंत पोहोचतो. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने आता आरटीआयच्या उत्तरात एचआयव्ही रूग्णांबाबत मोठा खुलासा केलाय.

२०२० मध्ये भारतात एचआयव्ही संक्रमितांचा आकडा 23,18,737 एवढा असल्याचे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने आरटीआयला दिलेल्या उत्तरात सांगितले आहे. या आकड्यामध्ये मोठी संख्या मुलांची आहे. हा आकडा तब्बल ८१,४३० एवढा आहे. या आजाराचं पूर्णत: निदान शोधण्यास तज्ज्ञांना अजूनही यश आलेलं नाही. त्यामुळे या रोगापासून तुम्हाला शक्य असेल तसा बचाव करणेच महत्वाचे ठरते.

AIDS म्हणजे काय?

एड्स हा एक असा आजार आहे जो एचआयव्ही रूग्णांमध्ये विकसित होतो. हे एचआयव्हीचं सगळ्यात अॅडवान्स स्टेज आहे. मात्र एखाद्या व्यक्तीत एचआयव्ही आहे याचा अर्थ असा मुळीच नाही की त्याच्यात एड्स विकसित होईल. माहितीसाठी हा आजार हवा, पाणी, हात लावल्याने किंवा कॅज्युअल काँटॅक्टमधून पसरत नाही.

HIV AIDS Symptoms
Health: वाचा काय सांगतं एम्स रिसर्च, डायबिटीजसह लठ्ठपणाही कमी करेल या आयुर्वेदिक औषधी

कसा पसरतो AIDS?

असुरक्षित लैंगिक संबंधातून हा आजार पसरतो.

इनफेक्टेड सिरींज किंवा निडिलमधून

इनफेक्टेड ब्लड ट्रांस्फुजनमधून

तसेच बाधित आईकडून बाळाला होऊ शकतो.

बाधित आईच्या दूधातूनही होऊ शकतो.

HIV AIDS Symptoms
प्रेम की वेडेपणा? १५ वर्षीय मुलीने HIV बाधित बॉयफ्रेंडचं ब्लड स्वत:च्या शरीरात सोडलं

एचआयव्हीची सुरूवाती लक्षणे

एचआयव्ही होण्याच्या काही आठवड्यापूर्वीला अॅक्यूट इंफेक्शन स्टेज म्हटलं जातं. या स्टेजदम्यान शरीरात व्हायरसचा प्रसार जलद गतीने वाढतो. बाधित व्यक्तीची इम्यून सिस्टीम एचआयव्ही अॅटीबॉडीजचं उत्पादन केल्यानंतर रिस्पाँड करते. या स्टेजदरम्यान काही लोकांना अजिबात लक्षणे दिसत नाहीत तर काही लोक वायरसच्या काँटॅक्टमध्ये येतात त्यांना लक्षणे उद्भवायला लागतात. या स्टेजचे लक्षणं साध्या फ्लू सारखे किंवा व्हायरल इन्फेक्शनसारखे असू शकतात. तुम्हाला शंका असल्यास लगेच टेस्ट करून घ्यावी.

HIV AIDS Symptoms
जागतिक एड्स दिन : काय आहे AIDS? जाणून घेऊया लक्षणे, कारणे आणि त्याविषयी सर्वकाही

काय आहे एचआयव्हीची लक्षणे?

ताप

ठंडी वाजणे

लिंप नोड्सवर सुजण येणे

सामान्य दुखणं आणि यातना

पोट खराब होणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com