
Do Not Be Scared About HMPV Virus: सध्या सर्वत्र एचएमपीव्ही व्हायरसबाबत वृत्तवाहिन्या माहिती देताना दिसत आहेत. चीनमधूनही या विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या पसरत आहेत. महाराष्ट्रात याचे रुग्ण सापडले आहेत. परंतु या बातम्यांच्या आधारे तुम्ही लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. हा संसर्ग वाटतो तितका घातक नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. नागरिकांनी या संसर्गाला घाबरून जाऊ नये असे महाराष्ट्राचे माजी साथरोग सर्वेक्षण अधिकारी, डॉ. प्रदीप आवटे यांनी एका व्हिडीओ मार्फत सांगितले आहे.