

Is Exercising at Home Without Supervision Safe?
Sakal
डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी)
जीवनमान-जीवनभान
तुम्ही दररोज व्यायाम करता का? नजीकच्या काळात व्यायाम करताना आकस्मिक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या काही घटना सर्वांच्याच वाचनात आल्या. अशा क्षणी बिनादेखरेखीखाली केलेला व्यायाम सुरक्षित आहे आहे का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. वेदशास्त्र किंवा आधुनिक वैद्यकशास्त्र असो, नित्य व्यायामाचे महत्त्व वादातीत आहे. बरेच लोक दररोज व्यायाम करतात; परंतु व्यायामाच्या गती आणि सुरक्षिततेविषयी अनभिज्ञ असतात. व्यायाम हा एक शरीरावर येणारा ‘सकारात्मक ताण’ आहे; पण तो प्रमाणाबाहेर दिल्यास किंवा अयोग्य उमेदवारास दिल्यास हानीकारक परिणाम दिसू शकतात. मग व्यायामाची सुरक्षितता वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो?