Winter Health : सकाळच्या वेळी पोट साफ होत नाही ? हा छोटासा उपाय देईल आराम

सकाळी पोट स्वच्छ असेल तर दिवसभर आपल्याला फ्रेश वाटते आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.
Winter Health
Winter Healthgoogle

मुंबई : आरोग्य निरोगी असेल तर, तुम्ही सुद्धा निरोगी असू शकतात. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चांगल्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे सकस आहार घेणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आतड्याची योग्य हालचाल देखील आवश्यक आहे.

सकाळी पोट स्वच्छ असेल तर दिवसभर आपल्याला फ्रेश वाटते आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते. तसेच वजनही नियंत्रित राहते आणि शरीर आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास जर सकाळी सकाळी होत असेल तर आपल्याला अजूनच वैतागल्यासारखे होते.

यासाठी आपण अनेक घरगुती उपायांचा अवलंब करतो. परंतु, अजून काही गोष्टी केल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते. हेही वाचा - भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

Winter Health
Physical Relation : लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी केलेली ही कृती ठरेल धोकादायक

रोज सकाळी व्यायाम करणे प्रत्येकाला जमत नाही परंतु, आरोग्याच्या अनेक व्याधीपासून सुटका हवी असल्यास काही प्रमाणात योग करणे गरजेचे आहे. बद्धकोष्ठतेपासून आराम हवा असल्यास आपण भुजंगासन केल्यास फायदा होऊ शकतो.

भुजंगासन हे भुजंग या शब्दापासून बनले आहे. याचा अर्थ सापासारखी मुद्रा. कोब्रा साप फणा पसरवताना तुम्ही पाहिला असेल. म्हणूनच याला कोब्रा स्ट्रेच असेही म्हणतात. हे आसन देखील सूर्यनमस्कारात समाविष्ट आहे.

जर तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल किंवा तुम्ही तणावाखाली असाल तर हे आसन केल्यावर तुम्हाला हलके वाटेल. पोटावर झोपून ते करावे लागते. हे संपूर्ण शरीर ताणते, ज्यामुळे थकवा निघून जातो. हे आसन करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. म्हणूनच तुम्ही हे रिकाम्या पोटी कधीही करू शकता.

Winter Health
Physical Relation : एकत्र कुटुंबात राहतानाही लैंगिक जीवनाचे खासगीपण कसे जपाल ?

भुजंगासन करण्याची योग्य पद्धत

  • सर्व प्रथम, आपल्या पोटावर झोपा. पाय सरळ आणि लांब पसरवा.

  • तळवे जमिनीवर खांद्याच्या खाली ठेवा. शरीर सैल सोडा.

  • श्वास घेत खांदे जमिनीवरून उचला

  • आता श्वास घेताना डोके आणि खांदे जमिनीपासून वर करा. शक्य तितक्या मागे डोके हलवा.

  • जेवढे शक्य असेल तेवढे पाठीमागे वाकवत रहा. तसेच कोपर सरळ करा.

  • श्वासावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे की श्वास आतच थांबला पाहिजे आणि काही काळ या स्थितीत रहा.

  • श्वास सोडताना खाली या.

  • हे आसन ५ वेळा करता येते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com