Video Viral : मिठाई बनवताना झाडूने पाठ खाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल; लोक संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral : मिठाई बनवताना झाडूने पाठ खाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल; लोक संतापले

Video Viral : मिठाई बनवताना झाडूने पाठ खाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल; लोक संतापले

अनेकांना चटपटीत खायला आवडतं. झटपट तयार होणारे आणि जीभेची चव वाढवणारे स्ट्रीट फूडचे अनेक शौकिन आपण पाहत असतो. मात्र काहीवेळा सोशल मीडियावर काही स्ट्रीट फूड विक्रेत्यांचे व्हिडीओ पाहून लोकांचे मन बिघडते. खरं तर, प्रत्येक माणसाला स्वच्छ अन्न मिळावं अशी इच्छा असते. पण जेव्हा पडद्यामागचा खेळ उलगडतो तेव्हा ग्राहकांना आपली फसवणूक झाली असल्याचे जाणवते.

हेही वाचा: नवरात्रीच्या उपवासाला 'हे' एनर्जेटिक पेय पिल्यास होईल फायदा; दिवसभर रहाल फ्रेश

सोशल मिडीयावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही क्लिप कधी आणि कुठे चित्रित करण्यात आलीये याची कोणतीही पुष्टी अजूनही झालेली नाही. मात्र क्लिपमध्ये कथित मिठाईवाला समोसे आणि डंपलिंग तळण्यासाठी लाडूने आपली पाठ खाजवताना दिसत आहे.

हा व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये हा मिठाईवाला समोसे आणि डंपलिंग फिल्टर करणाऱ्या लाडूने आपली पाठ खाजवताना दिसत आहे. मिठाईवाल्याचे हे कृत्य एका व्यक्तीने दुरूनच ते कॅमेऱ्यात कैद केले आहे. यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: भाज्या, सलाडचे पौष्टिक मूल्य टिकवून ठेवण्याचा उत्तम मार्ग; जाणून घ्या कोणता?

या व्हिडिओला 1 लाखाहून अधिक व्ह्यूज आणि 1200 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. आता यावर अनेकांनी आपल्या कमेंट्सही दिल्या आहेत. ते म्हणतात की, आता खरी चव यातून येते? अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे. हा आमच्या आरोग्याशी खेळ असल्याचे बोलले जात आहे. काहींनी ताजे समोसे खा, असे टोमणे मारून लिहिले. एका व्यक्तीने लिहिले की बाहेरचे अन्न सोडा.