प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात गरम मसाले नसतील तर स्वयंपाक अपूर्ण राहील असं म्हणायला हरकत नाही. मसाले भात असो वा बिर्याणी, दाल तडका, पनीर मखनीपासून अगदी तांबडा पांढरा रस्सा प्रत्येक पदार्थ लज्जतदार बनवतात ते म्हणजे गरम मसाले. स्वयंपाकांची चव वाढवणारे हे गरम मसाले आरोग्यासाठीदेखील तितकेच महत्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक गरम मसाल्याचा स्वाद जसा निराळा आहे. तसेच त्याचे औषधी गुणधर्मदेखील पाहायला मिळतात. Hot Spices in Kitchen Helpful for Health
वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यांसाठी Health Problems गरम मसाल्यांमधील जिन्नस उपयुक्त ठरू शकतात. या गरम मसाल्यांमधील Spices जवळपास सर्वच मसाल्यांमध्ये आयुर्वेदिक Ayurved गुणधर्म पाहायला मिळतात. खरं तर तुमच्या अनेक आरोग्यविषयक समस्यांसाठी तुम्हाला औषध दुकानात जाण्याआधी घरातील मसाल्यांचा डबा उघडणं गरजेचं आहे. कारण हेच मसाले तुमच्या अनेक समस्या दूर करू शकतात. indian spices benefits
हे देखिल वाचा-
अगदी सर्दी खोकल्यापासून ते कोलेस्ट्रॉलची Cholesterol समस्या दूर करण्यासाठी गरम मसाले गुणकारी आहेत. गरम मसाल्यांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्सचं प्रमाण अधिक असतं. गरम मसाले हे इम्युनिटी बुस्टरचं काम करतात. याशिवाय गरम मसाल्यांचे अनेक फायदे आहेत.जाणून घेऊयात गरम मसाल्यांचे आरोग्यदायी फायदे.
१. दालचिनी- दालचिनीमध्ये सिनामलडिहाइड असतं ज्यात अँटीव्हायरल, अँडी-बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे रक्तदाब आणि शरिरातील सारखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय दालचिनीमुळे पचनक्रिया देखील सुधारते. तसचं महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना आणि अतिरक्तस्त्राव अशा सगळ्यांच समस्यांवर दालचिनीचा चहा आराम मिळवून देतो.
२. चक्रफूल- चक्रफूलमधील गुणधर्मांमुळे पचनशक्ती सुधारते. गॅससंबधी समस्या दूर होण्यास मदत होते. चक्रफूलमध्ये असलेल्या अँटीफंगल गुणधर्मामुळे इंफेक्शनचा धोका कमी होतो. त्यामुळे त्वचेसंबधीच समस्येंसाठी चक्रफूल गुणकारी आहे. तसंच एका अभ्यासानुसार चक्रफूल ट्युमरची वाढ रोखण्यासाठी मदत होवू शकते. चक्रफूलच्या पावडरचा फेसमास्कमध्ये वापर केल्यास त्वचेवरील डाग फिके होण्यास मदत होते. तसचं सुरकत्यादेखील कमी होतात.
३. जिरे- जिऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जिर मुखशुद्धीचं काम करतं. तसचं वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी जिऱ्याचं पाणी प्यायल्यास चांगला फरक पडू शकतो.
४. मेथी- मेथीमध्ये बायोटिन, विटामिन ए, विटामिन डी असतं. मेथी मधुमेह, अल्सर आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. तसंच मायग्रेनच्या समस्येवरही मेथी गुणकारी ठरतं. तसंच मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी आणि केसांच्या उत्तम वाढीसाठी देखील मेथी उपायकारक आहे.
५. वेलची- रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी वेलची अत्यंत गुणकारी आहे. त्यासोबतच कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी देखील वेलचीचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं.
६. धणे- रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी धणे फायदेशीर ठरतात. अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण असलेले धणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. अपचन, डोकेदुखी तसचं पचसंबंधीत समस्या दूर करण्यासाठी धणे उपयुक्त ठरतात.
७. काळीमिरी- सर्दी खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी काळमिरी अत्यंत गुणकारी आहे. कप किंवा खोकल्याचा त्रास होत असल्यास काळ्यामिरीचा चहा प्यावा, तसचं सांधेदुखीसाठी देखील काळ्यामिरीचा आहारात समावेश केल्यास फरक जाणवतो.
८. लवंग- दातदुखीसाठी लवंग खालल्याने आराम मिळतो. तसंच मधुमेह, सायनस आणि पोटाच्या विविध समस्यां दूर करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. मळमळ किंवा उलटीचा त्रास होत असल्यास लवंग चघळल्यानंतर आराम मिळतो.
९. जावित्री- जावित्रीमध्ये मिनरल्स, कॅल्शियम आणि विविध पोषकतत्व उपलब्ध आहेत. किडनीसंबंधित समस्यांसाठी जावित्री उपायकारक आहे. मूतखडा विरघळण्यासाठी जावित्री गुणकारी आहे. तसंच जावित्रमुले अनिद्रा, तणाव आणि दमा यांसारखे त्रास कमी होण्यास मदत होते.
१०. जायफळ- निद्रानाश या समस्येवर जायफळ रामबाण उपाय आहे. एक ग्लास कोमट दूधात जाय़फळ पावडऱ टाकून प्यायल्यास निद्रानाश समस्या दूर होते. तसंच जायफळ पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं. संधिवातामध्ये जाळफळाचं सेवन केल्यास आराम मिळतो. तसचं सांध्यांवरील सूज कमी होवून वेदना कमी होण्यास मदत मिळते. जायफळमधील अँटी-मायक्रोबियस गुणदर्मामुळे पोटाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. तसचं डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि मधुमेह यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी जाय़फळ फायदेशीर ठरतं.
११. तमालपत्र- अनेक पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तमालपत्रांचे अनेक औषधी उपयोग आहेत. अपचन होत असल्यास तमालपत्राचं सेनव गुणकारी ठरतं. तसचं कफ, पित्त आणि झोप येत नसल्यास तमालपत्र फायदेशीर ठरतं. तमालुत्राच्या तेलाचाही अनेक समस्या दूर करण्यासाठी वापर केला जातो. डोके दुखी, कंबर दुखी अशा वेदनांवर तमालपत्राच्या तेलाने मसाज केल्यास आराम मिळतो. तमालपत्राचं पाणी प्यायल्याने किडनीस्टोन किंवा किडनीसंबधीत इतर समस्या दूर होण्यास मदत होते. गर्भाशयाची ताकद वाढवण्यासाठी तमालपत्र उपयुक्त ठरतं. त्याचसोबत सर्दी, मळमळ, मधुमेह अशा विविध आजारांवर तमालपत्राचा औषधी उपोयग केला जातो.
आपल्या स्वयंपाक घरातील हे मसाले आपल्या अनेक आरोग्याच्या समस्यांपासून आपल्याला दूर ठेवण्यास मदत करू शकतात. त्याचसोबत गरम मसाल्यातील ओवा आणि सुंठ हे देखील आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. सर्दी, पचनक्रिया सुधारण्यास ओवा आणि सुंठाची मदत होते.
टीप - वरील लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. वापर करण्यापूर्वी आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.