

Why Polluted Air Is Dangerous During Pregnancy & How to Stay Safe
sakal
Air Pollution Risks for Pregnant Women: बदलते वातावरण, वाढती झाडतोड, औद्योगिकीकरण, धूळ यासगळ्यामुळे हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. यासोबतच बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्य जपणं कठीण होत आहे. ही समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत, माणसांपासून प्राणी आणि पक्षी सगळ्यांसाठीच घातक ठरत आहे. मात्र याचा सर्वात जास्त धोका लहान मुलं, वयस्कर मंडळी, हृदय आणि फुफ्फुसांचे रुग्ण आणि प्रेग्नन्ट महिलांना जास्त होतोय. त्यातही प्रेग्नन्ट महिलांची काळजी घेणं जास्त महत्त्वाचा आहे कारण याचा परिणाम पोटातील बाळाच्या आरोग्यावरही होऊ शकतो.