Tobacco Addiction : तंबाखूचे व्‍यसन लागते कसे? वाचा सविस्तर

तंबाखूजन्‍य पदार्थ म्‍हणजेच तंबाखू जो मानवी शरीराला धोकादायक आहे. तंबाखूयुक्त पदार्थ बंदीचे विविध कायदे आहेत; मात्र त्याचा परिणाम नाही
Tobacco Addiction
Tobacco Addictionesakal

Tobacco Addiction : भारतात विविध रूपात तंबाखू उपलब्‍ध आहे. घोटून खाण्‍याचा तंबाखू जो चुन्यासोबत मिक्स करून खातात. ‘खर्रा’ ज्‍याला पश्चिम महाराष्‍ट्रात ‘मावा’ म्‍हणतात. यात सुपारी, तंबाखू, चुना व रंग आणि सुगंध येण्‍यासाठी इतर रासायनिक पदार्थ असतात. हाच वैदर्भीय खर्रा अनेकांचा जीव की प्राण आहे. मित्रांमध्ये त्याची हमखास देवाणघेवाण होते.

‘गुटखा’ अतिशय छोट्या आकर्षक रंगीबेरंगी वेष्‍टनात पॅक केलेला असतो. ज्‍यात सडकी सुपारी, तंबाखू, काथ, चुना इत्‍यादी पदार्थ मिक्‍स केले असतात. ‘मिश्री’ जी तव्‍यावर तंबाखू भाजून तयार केली जाते. ‘नस’ तंबाखू भाजून भुगा (क्‍यूर) केलेला तंबाखू, ‘गुडाखू’ ही तंबाखूचीच पेस्ट असते. ग्रामीण भागात याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ‘बिडी’, ‘सिगारेट’, ‘चिलीम’, ‘हुक्‍का’ याचा वापर धूम्रपानासाठी केला जातो. विशेषतः युवकांमध्ये सिगारेटचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. हे सर्व तंबाखूजन्‍य पदार्थ म्‍हणजेच तंबाखू जो मानवी शरीराला धोकादायक आहे. तंबाखूयुक्त पदार्थ बंदीचे विविध कायदे आहेत; मात्र त्याचा परिणाम नाही.

या तंबाखूची सवय लागते कशी? सुरुवातीला कुणाच्‍या आग्रहाखातर, एकदा खाऊन पाहावा किंवा टाईमपास म्‍हणून तंबाखूचे सेवन केले जाते. इतरांकडून अनुकरण केले जाते. जसे लहान मुलांसमोर आपल्‍या आई-वडिलांचा आदर्श असतो. आई-वडिलांपैकी कुणी तंबाखू सेवन करत असल्‍यास मुलांनाही सवय लागते. किशोरवयात, बरोबरीच्‍या मित्रांनी आपल्‍याला मान्‍यता द्यावी, कौतुक करावे म्हणूनही तंबाखू सेवनाची सवय जडते. काम करणारा मजूर थकवा जाण्‍यासाठी चिमूटभर तंबाखू तोंडात टाकतो व सवयीचा गुलाम होतो.

आदरातिथ्‍य म्‍हणूनही पानदानात तंबाखू ठेवला जातो. विरंगुळा व उत्‍सुकता म्‍हणून अनेक लोक तंबाखू खातात. ताणातून मुक्‍त होण्‍यासाठीही अनेक जण याचे सेवन करतात. निराशा आली की तंबाखू खातात. ग्रामीण भागातली अनेक लोक गैरसमजातून तंबाखू खायला लागतात. जसे तंबाखू सेवनाने पोटदुखी थांबते, संडास साफ होते, नस केल्याने दातदुखी बंद होते असे गैरसमज लोकांमध्ये आहेत. ज्‍यामुळे तंबाखूची सवय जडते. असे एक ना अनेक कारणे आहेत ज्यामुळे मुले, किशोरवयीन व मोठी माणसेच नव्हे तर स्रियासुद्धा तंबाखू खाण्याकडे वळतात.

Tobacco Addiction
World No Tobacco Day: चेनस्मोकिंगची सवय आहे? या आहारामुळे सुटणार धुम्रपान

सुरुवातीला सवय व पुढे व्यसन कसे लागते. अगदी पहिलीच वेळ असेल तर तोंडात ठेवल्‍याबरोबर काही सेकंदात तंबाखू झोंबायला लागतो. काही जणांना चक्‍कर येतो. ती वेळ कशीतरी निघून गेल्‍यावर थोडे बरे वाटायला लागते. याच झटक्‍यातून काही जण पुन्‍हा तंबाखू खात नाही. तर काही जणांना तसा प्रसंग पुन्‍हा पुन्‍हा येतो व थोडा थोडा तंबाखू सेवन करून करून मेंदूला त्‍याची सवय होते. चक्‍कर येणे कमी होते. पण, काही जण कधी तरी भेटला तरच खातात. हा माणूस तंबाखूच्‍या व्‍यसनी गटात मोडत नाही.

Tobacco Addiction
Tobacco Warning : तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकवर डिसेंबरपासून दिसणार नवे चित्र

पण काही असे असतात जे तंबाखूशिवाय नॉर्मल राहू शकत नाही. तंबाखू मिळाला नाही तर मानसिक त्रास सुरू होतो. ज्‍याला आपण तंबाखूचे विथड्रॉल्‍स म्‍हणतो. याच्या विविध अवस्था बघायला मिळतात. क्षणभंगूर आनंदाची अवस्‍था म्हणजे तंबाखू खाल्‍यावर थोडी तरतरी येते. टॉलरन्‍स म्हणजे काही दिवसातच तेवढ्या तरतरीने, आनंदाने भागत नाही. अधिक अधिक तंबाखू, खर्रा किंवा जो तंबाखूपदार्थ तो खातो, तो खावासा वाटतो. म्‍हणजे तो तंबाखूचा व्‍यसनी होतो.

विथड्रॉल्‍स म्हणजे, एकदा तो व्यक्ती व्यसनी झाला की, त्याला तंबाखू न मिळाल्यास मानसिक त्रास होतो. जो व्यक्ती आनंदाच्या अवस्थेनंतर थांबला तो थांबला नाही तर तो बुडालाचा म्हणून समजा. बुडाला मी यासाठी म्हणतो की, अनेक अभ्यासानुसार, तज्ज्ञांच्या मते व्यसनाच्या (Health) पातळीला पोहोचलेले व्यक्ती व्यसनातून बाहेर पडण्याचे अतिशय प्रमाण अतिअल्प आहे. काही जण मृत्यूनंतरच ते सोडतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सध्या विदर्भात खर्रा शौकिनांच्या बाबतीत हेच घडताना दिसते.

- मुक्तिपथ अभियान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com