
How to Make Instant Noodles Healthier For Pregnancy: प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि विशेष काळ म्हणजे गर्भधारणा. या काळात अनेक महिलांना काहीना काही चमचमीत, चविष्ट आणि झटपट खाण्याची इच्छा होत असते. या क्रेव्हिंग्स कधीही, केव्हाही आणि काहीही खाण्यासाठी होतात. एवढंच नाहीतर सोशल मीडियावर तर अक्षरश: महिला वेगवेगळे कॉम्बिनेशन्स ट्राय करतानाचे व्हिडिओ शेअर करत असतात.
या सगळ्यात इन्स्टंट नूडल्स हा एक सहज मिळणारा आणि पटकन तयार होणारा पर्याय आहे. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने हा पर्याय कितपत योग्य आहे, याचा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे.
इन्स्टंट नूडल्समध्ये मैदा, स्टार्च, पाम तेल, मीठ आणि चव वाढवणाऱ्या पदार्थांनी बनवले जातात. यामध्ये फायबर, प्रोटीन, आणि महत्त्वाचे जीवनसत्त्व फारसे नसतात. उलट यामध्ये सोडियम (मीठ), सॅच्युरेटेड फॅट्स (जास्त चरबी), आणि केमिकल प्रिझर्वेटिव्ह जास्त असतात. जे गर्भवती महिलांसाठी घातक ठरू शकते.
- मीठाचं प्रमाण जास्त असतं: यामुळे पाय सुजणे, उच्च रक्तदाब, किंवा पाण्याची अडचण निर्माण होऊ शकते.
- पोषण कमी असतं: नूडल्समध्ये बाळाच्या वाढीसाठी लागणारे आवश्यक पोषकतत्त्व जसे की प्रोटीन, आयर्न, फॉलिक अॅसिड फारसे नसतात.
- मैदा वापरलेला असतो: मैदा पचायला जड असतो आणि यामध्ये फायबर नसल्यामुळे बद्धकोष्ठता (कोष्टबद्धता) वाढू शकते.
- एम.एस.जी. (Ajinomoto): काही ब्रँड्समध्ये चव वाढवण्यासाठी याचा वापर होतो. काही लोकांना यामुळे डोकेदुखी, चक्कर, घाम येणे असे त्रास होऊ शकतात.
- टी.बी.एच.क्यू. सारखे प्रिझर्वेटिव्ह: हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, विशेषतः जर वारंवार नूडल्स खाल्ल्या तर.
अजिबातच नूडल्स खाऊ नये असे नाही . पण वारंवार खाऊ नये. कधी कधी खाण्याची इच्छा झाल्यास काही गोष्टी लक्षात घेतल्यास त्याचे हानिकारक परिणाम कमी करता येतात.
- भाज्या घाला: पालक, गाजर, मटार, कोबी, टोमॅटो यासारख्या भाज्या टाका. यामुळे फायबर आणि व्हिटॅमिन्स वाढतात.
- प्रोटीनचा समावेश करा: उकडलेलं अंडं, पनीर, तुकड्यांमधील चिकन किंवा टोफू वापरू शकता.
- चव देणारा पुडका कमी वापरा: पूर्ण पुडका न वापरता त्यातला थोडाच भाग घ्या किंवा घरगुती मसाले वापरा.
- सूप कमी प्या: नूडल्सचं पाणी पिणं म्हणजे अतिरिक्त मीठ घेणं. त्यामुळे सूप पिणं टाळा.
- मैद्याऐवजी संपूर्ण गहू किंवा मल्टीग्रेन नूडल्स निवडा.
- पॅकेट वाचून घ्या: TBHQ, MSG सारखे घटक आहेत का हे बघा. शक्य असल्यास ते टाळा.
डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ सांगतात की, गर्भधारणेदरम्यान शरीराला जास्त पोषणाची गरज असते. त्यामुळे रोजच्या आहारात इंस्टंट नूडल्स टाळावे. पण कधीतरी खाणं चालतं. फक्त त्यात काही आरोग्यदायी बदल करणे गरजेचे आहे. विशेषतः तुम्हाला उच्च रक्तदाब, साखर किंवा इतर त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.