
थोडक्यात
सतत ८ तास बसल्याने रक्तप्रवाह मंदावतो, ज्यामुळे रक्ताभिसरण खराब होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो.
पायांमध्ये रक्त साचणे, सुन्नपणा किंवा रक्ताच्या गाठी (DVT) होण्याचा धोका वाढतो.
नियमित हालचाल आणि स्ट्रेचिंगमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो.
Effects of prolonged sitting on blood circulation: जे लोकशेतात काम करतात त्यांच्या शरीराची हालचाल होत राहते, पण जे लोक ऑफिसमध्ये शिफ्ट संपेपर्यंत खुर्चीला चिटकून बसलेले असतात, त्याच्या शरीराची हालचाल होत नाही. अनेक लोक कॉर्पोरेट जीवन जगत आहेत आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात वेदना सहन करत आहेत. तासंतास सतत बसून राहिल्याने शरीरातील रक्तप्रवाहावर काय परिणाम होतो हे जाणून घेणे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहे. याबाबत डॉक्टर काय सांगतात हे जाणून घेऊया.