

How Much Sugar Should Kids Have Before Age 2? Study Finds Long-Term Impact
sakal
Toddler Sugar Intake Guidelines: वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत मुलांच्या आहारात साखरेचे प्रमाण कमी किंवा नाहीच्या समान ठेवल्यास त्याचा फायदा अनेक वर्षांनंतरही होऊ शकतो, असे नव्या संशोधनातून समोर आले आहे. पहिल्या १,००० दिवसांत म्हणजे गर्भधारणेपासून मुलाच्या साधारण दुसऱ्या वाढदिवसापर्यंत कमी साखरेचा संपर्क असलेल्या लोकांमध्ये पुढील आयुष्यात कॅन्सरचा धोका आणि वयाशी संबंधित काही आजारांचे प्रमाण कमी असल्याचे संशोधकांना आढळले.