
Rashtriya Arogya Nidhi: आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी मदत मिळावी म्हणून आरोग्य मंत्र्यांच्या विवेकाधीन अनुदान योजना (HMDG) राबवली जाते. या योजनेअंतर्गत ज्या गंभीर आजारांवर मोफत उपचार उपलब्ध नाहीत, त्यासाठी ठराविक आर्थिक सहाय्य दिले जाते. गरीब आणि गरजू रुग्णांना सरकारी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी ही मदत मिळते.