- महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षकवजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्या बऱ्याच लोकांना मी भेटतो. ते वजन कमी करण्यासाठी आपल्या चयापचय दरावर काम करणे सोडून बाकी सगळ्या गोष्टी करतात. खरेतर वजन कमी करण्यासाठी तीच सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. .नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंगमसल म्हणजे लीन बॉडी मास. एक किलो मसल मास आपला बेसल मेटाबोलिक रेट दररोज १०० कॅलरीइतका वाढवते. शारीरिक हालचालींमुळे आपल्या स्नायूंमधील आणखी कॅलरी बर्न होतात. खूप जास्त स्ट्रेंथ ट्रेनिंग सेशनमुळे आपला बेसल चयापचय दर सुमारे चार दिवसांपर्यंत वाढू शकतो. परिणामी, व्यायाम पूर्ण झाल्यावर देखील आपले शरीर जास्तीच्या कॅलरी बर्न करत राहते. स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये सातत्य राखल्यास शरीराच्या ऊर्जेची आवश्यकता सतत वाढत राहते..एंड्युरन्स ट्रेनिंगएरोबिक एंड्युरन्स ट्रेनिंगचा बेसल चयापचय रेटवर स्ट्रेंथ ट्रेनिंगपेक्षा कमी परिणाम होतो. आपल्या हार्ट रेटच्या ६५ टक्के गतीने आणि एका तासाच्या कार्डिओ ट्रेनिंगमुळे सुमारे तीनशे-चारशे कॅलरीज बर्न होतात. म्हणजेच आपण एक तासाचा कार्डिओ व्यायाम दर आठवड्याला तीन तास इतका केला, तर एक वेळेचे मिष्टान्नाचे जेवण पचवता येईल. कार्डिओ ट्रेनिंग हे आफ्टरबर्न इफेक्टसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंगपेक्षा कमी महत्त्वपूर्ण आहे..कार्डिओ प्रशिक्षण महत्त्वाचे आहे- कारण हाय इंटेन्सिटी इंटर्व्हल ट्रेनिंग (एचआयआयटी) हा कार्डिओ प्रशिक्षणातील विशेष प्रभावी प्रकार आहे. यासाठी तुलनेने जास्त प्रमाणात ऊर्जा आवश्यक असते आणि आपल्या चयापचयचा दर लक्षणीय वाढतो. कारण उच्च-तीव्रतेच्या स्ट्रेंथ ट्रेनिंगप्रमाणे बेसल चयापचयचा दर ८-२४ तास चालतो.एरोबिक आणि एचआयआयटी दोन्ही प्रशिक्षणांसाठी एक गोष्ट खरी आहे : आपला स्टॅमिना आणि ऑक्सिजन अपटेक (व्हीओ २ मॅक्स) जितका जास्त असेल तितके आपले शरीर फॅटचे ऊर्जेमध्ये रूपांतर करेल. या दोन्ही पद्धती आपला चयापचय दर योग्य राखण्यासाठी मदत करतात. तरीही, एचआयआयटी व्यायाम एन्ड्युरन्स ट्रेनिंगपेक्षा व्हीओ २ मॅक्स वाढवण्यास जवळजवळ तीनपट वेगाने मदत करते..रूटिनमध्ये जास्त शारीरिक क्रियांचा समावेशदैनंदिन जीवनात अधिक सक्रिय राहणे म्हणजे आपले रक्ताभिसरण योग्य गतीने चालू ठेवणे आणि आपला चयापचय दर चांगला ठेवणे महत्त्वाचे आहे. नियमित शारीरिक क्रिया आपल्या चयापचयाचा दर वाढवण्याचा आणि दीर्घकालीन वेग टिकवून ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. केवळ शनिवार-रविवार व्यायाम केल्याने आपल्या चयापचय क्रियेचा रेट आठवडाभर व्यायामा केल्याइतका वाढणार नाही. मग आपण त्या दोन दिवसात कितीही जास्त व्यायाम केला तरीही..!.कॉन्ट्रास्ट शॉवर घ्या (थंड-गरम पाणी)आपण कॉन्ट्रास्ट शॉवर घेता, तेव्हा पाण्याच्या तापमानात होणाऱ्या अचानक बदलामुळे आपल्या शरीराला हा बदल स्वीकारण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे चयापचय क्रियेच्या गतीला चालना मिळते आणि कमी रक्तदाब राखण्यास मदत होते. स्नायूंच्या आकुंचन आणि प्रसारणामुळे शरीरातील सर्व टॉक्झिन्स शरीराबाहेर टाकणे शक्य होते. सर्वसाधारणपणे, शक्य तितके जास्त तापमान ठेवून आणि शक्य तितके कमी तापमान ठेवून शॉवर घेण्याचा प्रयत्न करा. गरम पाण्याने सुरुवात करावी आणि थंड पाण्याने संपवावे. तज्ज्ञाच्या मते साधारण ३० सेकंदाचा एक शॉवर असावा..पुरेशी झोपपुरेशी विश्रांती घेणाऱ्या व्यक्ती व्यवस्थित झोप न घेणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त बारीक असतात- जरी त्या दोन्ही व्यक्ती समान प्रमाणात कॅलरीज घेत असल्या तरीही...! परंतु या गोष्टीचे योग्य कारण सापडले नाही. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे, की झोपेचा अभाव चयापचयाचा दर कमी करतो आणि पुरेशी झोप न घेणाऱ्या व्यक्तींमध्ये रोजच्या हालचालीसाठी लागणारी ऊर्जा कमी असते..नियमितपणे वेळेवर जेवणदोन किंवा तीन वेळा भरपेट जेवण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने खाणे आपला चयापचय दर चांगला ठेवण्यासाठी उपयोगी पडते. तथापि, एखादे जेवण चुकवले, तर शरीर अन्नाच्या कमतरतेशी जुळवून घ्यायला लागते त्यामुळे आपला चयापचयचा वेग कमी होईल.भरपूर पाणी पिणेउच्च चयापचय दरासाठी आणि आपली रोजची कामगिरी चांगली होण्यासाठी शरीर हायड्रेटेड राखणे गरजेचे आहे. त्यासाठी रोज दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. आपण दिवसात जास्तीत जास्त किती पाणी प्यावे याचे काही प्रमाण नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.