Anxiety Attack : तुम्हालाही अचानक अस्वस्थ किंवा घाबरल्यासारखं वाटतं का? एंझायटी अटॅकवर करा हे उपाय

जर तुम्हाला वारंवार एंझायटी अटॅक येत असतील तर तुम्ही खालीलप्रमाणे हे एंझायटी अटॅक कंट्रोल करू शकता.
Anxiety Attack
Anxiety Attacksakal

Anxiety Attack : अचानक अस्वस्थ वाटण किंवा घाबरणे, हा एक साधा मानसिक आजार आहे. यामुळे अनेकदा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एखाद्या स्ट्रेसफुल परिस्थितीत कोणालाही अस्वस्थ वाटू शकतं किंवा तुम्ही घाबरु शकतात पण याचं प्रमाण वाढल्यास हे तितकंच धोकादायकही ठरू शकतं. यालाच आपण एंझायटी अटॅक सुद्धा म्हणतो.

जर तुम्हाला वारंवार एंझायटी अटॅक येत असतील तर तुम्ही खालीलप्रमाणे हे एंझायटी अटॅक कंट्रोल करू शकता. चला तर सविस्तर जाणून घेऊया. (how to deal with Anxiety attack try these tips)

  • एंझायटी अटॅकसाठी अॅड्रेलाईन (adrenaline) हार्मोन जबाबदार असतो. अॅड्रेलाईनची मात्रा हाय झाली की एंझायटी येत असते ज्यामुळे अस्वस्थ वाटते किंवा घाबरल्यासारखं होतं.

  • एंझायटीचा त्रास तुम्हाला होत असेल तर त्याचे लक्षणे सुरवातीला जाणून घ्या जसे की हार्टबीट वाढणे, घाम फुटणे, थरथर कापणे, अंगावर काटे येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, निराश वाटणे. ही लक्षणे दिसताच त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा

  • खोलवर श्वास घेणे हा एंझायटीपासून सुटका मिळवण्याचा चांगला मार्ग आहे. नाकातून हळूवार श्वास घेणे, श्वास सोडणे, काही सेकंदासाठी श्वास घेणे थांबविणे आणि तोंडाने श्वास घेणे हे सुद्धा तुम्हाला एंझायटीला दूर ठेवण्यास मदत करतात.

  • तुमच्या सेन्सवर फोकस करा जसे की एखादा स्मेल तुम्हाला आवडतो ज्यामुळे तुम्हाला रिलॅक्स फील होते. यामुळे सुद्धा एंझायटीपासून सुटका मिळते.

  • एंझाटयी अटॅक दरम्यान तुमचे विचार नकारात्मक होऊ शकतात. त्यामुळे आपलं मन स्थिर ठेवायचा प्रयत्न करा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा आणि पॉझिटिव्ह गोष्टींवर फोकस ठेवा.

  • जर तुम्हाला एंझायटीचा त्रास असेल तर मदत मागायला मागेपुढे पाहू नका. जेव्हा तुम्हाला एंझायटी अटॅक येतो तेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा सपोर्ट तुम्हाला धैर्य देतो. अशावेळी आपल्या मित्रांशी, कुटूंबासोबत किंवा जवळच्या व्यक्तीसोबत मनमोकळेपणाने बोला. डॉक्टरांना वेळोवेळी संपर्क साधा.

Anxiety Attack
Health Tips: 'या' लोकांनी चुकूनही लिची खाऊ नये, आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

स्वत:ला रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ, नियमित योगा करणे, शांत म्युझिक ऐकणे, पुस्तक वाचणे, किंवा आवडती गोष्ट करणे जसे की डान्सिंग, सिंगिग किंवा चित्र काढणे अशा अॅक्टिव्हीटीज तुम्ही करू शकता. यामुळे तुमचं मन गुंतून राहणार आणि तुम्ही एंझायटीवर मात करू शकाल.

जर तुम्हाला एंझायटीचा त्रास होत असेल तर स्वत:ची काळजी घेणे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. फिजिकली आणि मेटंली तुम्ही खूप स्ट्राँग असणे आवश्यक आहे. चांगली झोप, चांगला आहार, नियमित व्यायाम यामुळेही तुम्ही स्वत:ला हेल्दी ठेवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com