
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची काळजी कशी घ्याल? या सोप्या टिप्स फॉलो करा
आपल्याकडे एक म्हण आहे. पाणी हे जीवन आहे. पण हेच पाणी जर का खराब असलं तर ते तुमचं आरोग्य खराब करू शकतं.सर्वांना पावसाळा ऋतु हवाहवासा वाटतो. बाहेर धो-धो पडणारा पाऊस आणि मस्त वाफाळता चहा, सोबत गरमगरम कांदाभजी हे सगळं सुख पावसाळ्यात अनुभवायला भेटतं. काही जण घरात बसून पावसाळ्याचा आनंद घेतात तर काही जण बाहेर मस्त भटकंती करुन पावसात भिजून आनंद लुटतात. पण पावसाळा आनंदासोबत अनेक आजारही घेऊन येतो, हे विसरता कामा नये.
पावसाळ्यात हवेतून पसरणारे आजार, विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य संसर्ग, हंगामी ऍलर्जी आणि डासांमुळे होणारे आजार असतात. आणि हेच आजार मग पावसाळ्यात लोकांना आपली शिकार बनवतात. त्यामुळे पावसाळ्यात सगळे जण मोठ्या प्रमाणात आजारी पडतात.
हेही वाचा: बैठी जीवनशैली आणि वजन!
ऋतू संक्रमणाच्या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवणे आणि योग्य आहाराद्वारे ती वाढवणे हाच ऋतू संक्रमणाच्या वेळी होणाऱ्या आजारापासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग आहे. या पावसाळ्यात तुमच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तुमच्या आहारात सकस अन्न घटकांचा समावेश करा. कारण तुमच्या पिण्याच्या पाण्याइतकी साधी गोष्टसुध्दा तुम्हाला आजारी पाडू शकते.
आपल्या आयुर्वेदात असे सांगितले आहे की, तुम्हाला जर का तुमचे आरोग्य तंदुरुस्त ठेवायचे असले तर नियमितपणे पोटभर पाणी पिणे गरजेचे आहे. तुम्ही कोणतं पाणी आणि ते किती पिता हे तुमच्या शरीराच्या कार्यपद्धतीत खूप फरक पाडू शकतं.
हेही वाचा: प्लॅन करण्यात आयुष्य घालवू नका
आयुर्वेद तज्ञ डॉ. आशुतोष गौतम यांनी आपल्या लक्षात आणून दिले की, पावसाळ्यात सर्वाधिक आजार हे अशुद्ध पाण्यामुळे होतात. पाणी हे देखील आजार पसरवण्याचे कारण होऊ शकतं.
१) स्वच्छ पाणी
तुम्हाला पिण्याचे पाणी स्वच्छ उपलब्ध असले तरीही, तुमच्या पिण्याच्या पाण्यात नियमितपणे जिवन ड्रॉपचे दोन थेंब टाकुनच ते पाणी प्यावे.
२) तांब्याच्या भांडयातील पाणी पिणे
तांब्याच्या भांड्यात किंवा चांदीच्या भांड्यात साठवून ठेवलेले पाणी पिणे, हे आरोग्याकरीता उत्तम असतं.विशेषतः पावसाळ्यात तरी नियमितपणे तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावे. तांबे आणि चांदीचे भांडे तुमच्या पिण्याच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म येतात.
हेही वाचा: पावसाळ्यात खा 'या' सहा चवदार भजी, पचनक्रियाही करणार सुरुळीत!
३)कोमट पाणी प्या
लोकांना पावसाळ्यात अपपचनाच्या समस्या वाढतात त्यामुळे दिवसभर कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसेच पाणी हे नेहमी जेवणानंतर पाणी प्या. जेवणापूर्वी किंवा जेवणादरम्यानच पाणी पिणे टाळावे.
तज्ञ असही सांगतात की, जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. पाणी पितांना ते एक एक घोट घेऊनच प्यावे. हा नियम तुम्ही वर्षभर पाळला पाहिजे. पाणी नेहमी आरामाने एक एक घोट प्यावे, दररोज तुम्ही किमान दोन लिटर तरी पाणी पिणे गरजेचं असतं.
४) पाण्यात तुरटी फिरवा
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात तुरटी फिरवून घेणे सुध्दा चांगले असते. त्यामुळे पाण्यातील गाळ खाली बसतो अणि नंतर ते पाणी तुम्ही पिण्याकरता घेऊ शकतात.
Web Title: How To Drink Safe Water In Monsoon Check Here Tips
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..