

Natural Ways to Increase Haemoglobin Levels
sakal
NUTRITIONIST TIPS TO IMPROVE IRON INTAKE: बरेचजण रात्री ७-८ तासांची पुरेशी झोप घेतात, तरीही सकाळी उठल्यानंतर फ्रेश किंवा उत्साही वाटत नाही. उलट थकवा, अशक्तपणा किंवा चक्कर आल्यासारखं जाणवतं. अशा वेळी शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी असण्याची शक्यता असू शकते. हिमोग्लोबिनचं मुख्य काम शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवणं आहे. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिमोग्लोबिनची योग्य पातळी राखणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आहारातून पुरेसं लोह (Iron) मिळणं, त्याचं शरीरात योग्य प्रकारे शोषण होणं आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. न्यूट्रिशनिस्ट पूजा जैसवाल सांगतात रोजच्या आहारात काय बदल केले की कमतरता भरू शकते.