Brain Stroke Symptoms: ब्रेन स्ट्रोक आलाय हे कसं ओळखायचं? ही ३ लक्षणं तुम्हाला करतील मदत

How To Identify Brain Stroke Symptoms Early: मेंदूच्या स्ट्रोकची ही ३ लक्षणं वेळेत ओळखली तर वेळीच योग्य उपचार घेऊन जीव वाचवता येऊ शकतो.
Symptoms Of Brain Stroke
Symptoms Of Brain Strokesakal
Updated on

Early Warning Signs Of Brain Stroke In Marathi: हार्ट अटॅक सारखीच स्ट्रोक ही एक अशी स्थिती आहे जी अचानक येते आणि जीवावर बेतू शकते. तसेच हार्ट अटॅक सारखाच स्ट्रोक कधी येईल हे तुम्हाला सांगता येत नाही.

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी सुमारे १५ दशलक्ष लोकांना स्ट्रोक येतो. त्यातल्या ५ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो आणि इतकेच लोक कायमचे अपंग होतात. त्यामुळे स्ट्रोकची लक्षणं ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. त्याआधी स्ट्रोक म्हणजे नेमकं काय हे पाहूया.

ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय?

ब्रेन स्ट्रोक, ज्याला मेंदूचा झटका असंही म्हणतात, तेव्हा होतो जेव्हा मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह अचानक थांबतो किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव (Bleeding) होतो. स्ट्रोकचे दोन मुख्य प्रकार आहेत – इस्केमिक स्ट्रोक (Ischemic stroke) आणि हेमोरॅजिक स्ट्रोक (Hemorrhagic stroke).

इस्केमिक स्ट्रोक

जास्तीत जास्त लोकांना होणारा स्ट्रोक म्हणजे इस्केमिक स्ट्रोक. यामध्ये मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा येतो. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजन आणि पोषणद्रव्य मिळत नाहीत. यामुळे काहीच मिनिटांत मेंदूतील पेशी मरायला लागतात.

Symptoms Of Brain Stroke
Alarms and Hypertension: अलार्म’ने जाग येणं ठरतंय ‘हाय ब्लड प्रेशर’चं कारण? मेंदूविकार तज्ज्ञांच्या संशोधनात काय सांगितलंय?

हेमोरॅजिक स्ट्रोक

हेमोरॅजिक स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा मेंदूमधील एखादी रक्तवाहिनी फुटते किंवा रक्तस्त्राव होऊ लागतो. या रक्तस्रावामुळे मेंदूवर दाब येतो आणि पेशींना मोठं नुकसान होतं.

स्ट्रोकमुळे मेंदूचं कायमचं नुकसान होऊ शकतं. काही लोकांना अपंगत्व येऊ शकतं, तर काही वेळा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. म्हणूनच, स्ट्रोकची लक्षणं ओळखून वेळीच उपचार करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी पुढे दिलेली ब्रेन स्ट्रोकची तीन मुख्य लक्षणं चुकवू नये.

ब्रेन स्ट्रोकची ३ मुख्य लक्षणं

चेहरा वाकडा होणं

स्ट्रोकचं सर्वात लवकर दिसणारं लक्षण म्हणजे चेहरा वाकडा होणं. हे सहसा चेहऱ्याच्या एका बाजूला होतं. व्यक्तीला कदाचित ते लक्षातही येणार नाही, पण आजूबाजूच्यांना ते स्पष्ट दिसतं. त्या व्यक्तीला हसायला सांगितल्यावर लक्षात येईल की चेहऱ्याचा एक भाग खाली ओढला गेला आहे किंवा एक बाजू हलत नाही.

हात-पाय कमकुवत होणं किंवा अचानक बधीर होणं

जर अचानक एका बाजूचा हात किंवा पाय चालेनासा झाला, बधीर वाटू लागला तर ते स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. दोन्ही हात वर करायला सांगा – जर एक हात खाली झुकतो किंवा न हलवता खाली आला, तर ही धोक्याची घंटा आहे.

बोलण्यात अडचण येणं

बोलताना अडखळणं, शब्द नीट न उच्चारता येणं, दुसऱ्याचं बोलणं समजण्यात अडचण येणं ही स्ट्रोकची अजून एक महत्त्वाची खूण आहे. स्ट्रोक आल्यावर व्यक्ती अचानक गोंधळलेली वाटू शकते, वाक्य अर्धवट बोलते किंवा चुकीचे शब्द वापरते.

Symptoms Of Brain Stroke
Caffeine Effects On Heart Health: तुम्ही पण कॉफी अ‍ॅडिक्ट आहात? मग आत्ताच सावध व्हा! होऊ शकतो हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम

हे लक्षात ठेवा

स्ट्रोक ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे. वरीलपैकी कोणतीही लक्षणं दिसली की लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य त्या उपचारात उशीर करू नका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com