Child Brain : मुलांना बनवायचे असेल हुशार तर असा असावा आहार

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पोषणाची व्याख्या शरीराच्या पौष्टिक गरजा लक्षात घेऊन अन्नाचे केलेले सेवन अशी केली आहे. चांगल्या आरोग्याचा पाया हा उत्कृष्ट पोषणाने ठरतो.
Child Brain
Child Braingoogle

मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून तज्ज्ञ योग्य पोषण आणि बौध्दिक विकास यांच्यातील संबंधावर संशोधन करत आहेत आणि त्यांच्यापैकी अनेकांनी केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की अपुरे पोषण मुलांच्या मेंदूच्या विकासावर नकारात्मक परिणाम करतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पोषणाची व्याख्या शरीराच्या पौष्टिक गरजा लक्षात घेऊन अन्नाचे केलेले सेवन अशी केली आहे. चांगल्या आरोग्याचा पाया हा उत्कृष्ट पोषणाने ठरतो.

शारीरिक व्यायामासह संतुलित आहाराचे सेवनही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रतिकारशक्ती कमी होणे, रोग बळावण्याची शक्यता, शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटणे अशा अनेक समस्या चुकीच्या पोषणामुळे होऊ शकतात. याबद्दल सांगत आहेत अपोलो स्पेक्ट्राचे आहारतज्ज्ञ डॉ.जीनल पटेल. हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Child Brain
Parenting Tips : मुलांचा स्क्रीन टाइम कसा कमी कराल ?

अन्न आणि आयक्यू यांच्यातील परस्परसंबंध

मेंदूचे बिघडलेले कार्य हे बहुतेकदा चयापचय विकार (जसे की लठ्ठपणा) आणि चुकीच्या आहार पद्धतींमुळे उद्भवते. लठ्ठपणा आणि चुकीच्या आहाराचे बौध्दिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात म्हणून पोषक आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे.

गर्भधारणेदरम्यान योग्य पोषक आहाराचे सेवन न केल्याने आणि जन्मानंतरच्या बाळाला पचनासंबंधीत समस्या उद्भवू शकतात आणि मेंदूच्या कार्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

लहानपणी चरबीयुक्त आणि शर्करायुक्त पेयांचे अतिप्रमाणातील सेवन भविष्यात लठ्ठपणाचे कारण ठरु शकते.

न्याहारी वगळू नका

सकाळी शाळेत जाण्यापूर्वी खाल्लेल्या अन्नाला न्याहारी म्हणतात. जे विद्यार्थी न्याहारी घेतात त्यांच्याकडे एकाग्रता आणि शाळेतील उपस्थिती, तसेच परीक्षेत यश आणि अभ्यासाचा उत्साह दिसून येतो.

याउलट जे विद्यार्थी न्याहारी घेत नाहीत त्यांच्यामध्ये या वरील गोष्टी दिसून येत नाही असा निष्कर्ष अर्नेस्टो पोलिट यांच्या संशोधनाद्वारे काढण्यात आला आहे. जी मुले न्याहारी वगळतात त्यांची बौध्दिक क्षमता इतरांच्या तुलनेने कमी दिसून येते.

2010 च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की लोहाची कमतरता नसलेल्या तसेच सशक्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती चांगली आणि जलद होते.

Child Brain
Parenting Tips : पालकांनो सावधान ! मुलांच्या स्वभावातील हे बदल असतात मोठी समस्या

तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर तुमच्या आहाराचा प्रभाव पडतो. मेंदू आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या व्यवस्थापनासह अनेक महत्त्वपूर्ण प्रक्रियांसाठी महत्त्वाची भूमिका बजावितो.

अशा प्रकारे, त्याचे आरोग्य राखण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या आहाराचा मेंदूच्या कार्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडत असल्याने आपण पोषक आहाराचे सेवन करावे.

ओमेगा -3 फॅटी अॅसिडसने समृध्द आहाराचे सेवन करावे. आपली एकाग्रता, स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता यासारख्या आपल्या संज्ञानात्मक क्षमता संतुलित आहाराने वाढवल्या जाऊ शकतात. पौष्टिक, ताजे अन्नपदार्थांचे सेवन करणे हे तुमच्या मेंदूसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com