
Dehydration In Kids: मे महिना सुरू झाला असून उन्हाच्या तीव्र झळा अधिक वाढल्या आहेत. दिवसा उन्हाच्या जास्त तडाखा जाणवत आहे. मे महिन्यातील कडक उन्हाने लोक त्रस्त आले आहेत. विशेषत: लहान मुलांना उन्हाचा अधिक त्रास जाणवतो. कडक उन्हात आरोग्यासंबंधित अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यामध्ये डिहायड्रेशचा त्रास लहान मुलांना अधिक होतो. पालकांना उन्हाळ्यात लहान मुलांची कशी काळजी घ्यावी याबाबत प्रश्न पडतात. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुले बाहेर खेळतात आणि खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी पालकांनी कडक उन्हाळ्यात लहान मुलांचा 'डिहायड्रेशन' पासून कसा बचाव करावा याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा कतरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.