

Increased Cases Of Fatty Liver In India
esakal
Lifestyle vs. Liver: आधी मद्यपानाशी जोडला जाणारा फॅटी लिव्हर आता चुकीची जीवनशैली, वाढते वजन आणि मेटाबॉलिक विकारांमुळे जास्त प्रमाणात आढळत आहे. भारतीय पुरुषांमध्ये या आजाराचा धोका महिलांपेक्षा अधिक असल्याचे विविध संशोधनांतून समोर आले आहे.
2021 मध्ये झालेल्या एका भारतीय संशोधनानुसार देशातील सुमारे 38.6 टक्के प्रौढांमध्ये नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) आढळून आला. या आजाराला आता मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टिटोअॅटिक लिव्हर डिसीज (MASLD) असे नाव देण्यात आले आहे. लठ्ठपणा किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण 52 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
दक्षिण भारतातील गंभीर लठ्ठपणामुळे बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांवरील अभ्यासात जवळपास 66 टक्के रुग्णांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या आढळली. तसेच चेन्नईतील एका संशोधनानुसार पुरुषांना महिलांच्या तुलनेत हा आजार होण्याचा धोका 1.59 पट अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.