Health Care Tips: तुमच्या जेवणात वापरलेला कांदा योग्य आहे ना? जाणून घ्या कांद्याचे प्रकार अन् फायदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Care Tips

Health Care Tips: तुमच्या जेवणात वापरलेला कांदा योग्य आहे ना? जाणून घ्या कांद्याचे प्रकार अन् फायदे

कांदा हा जवळपास सगळ्यांच्याच जेवणात असणारा महत्वाचा घटक आहे. कांद्याशिवाय अनेकांच्या घरी भाजीची फोडणीच दिल्या जात नाही. सहसा आपल्याला दोन प्रकारचे कांदे माहिती असतील एक म्हणजे पांढरा कांदा आणि दुसरा म्हणजे गुलाबी कांदा. मात्र आहारासाठी योग्य कांदा कसा निवडायचा हे अनेकांना माहितीच नाही. तेव्हा आज आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

तुम्ही वाचून चकीत व्हाल पण कांद्याचे एकूण सहा प्रकार आहेत. या प्रकारांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

लाल कांदा (Red Onion)

नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. येथे लाल कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. या कांदा सामान्य कांद्यापेक्षा जरा मोठा असतो आणि त्याची चव तेज असते. हा कांदा चिरताना आणि सोलताना डोळ्यांमध्ये जळजळ होते. या कांद्याची पेस्ट ग्रेव्ही करण्यासाठी उत्तम आहे.

गोड कांदा (Sweet Onion)

हा कांदा चवीला गोड असून तो जरा हलक्या सोनेरी रंगाचा असतो. या कांद्यामध्ये इतर कांद्यांप्रमाणे तिखटपणा नसतो.

पिवळा किंवा तपकिरी रंगाचा कांदा (Yellow Onion/Brown Onion)

हा कांदा इतर कांद्यापेक्षा स्वस्त असतो. जर तुम्हाला खाण्यासाठी कुठला कांदा विकत घ्यावा असा प्रश्न पडत असेल तर हा कांदा एकदम परफेक्ट. या कांद्याची चव तिखट असते. इतर कांद्यापेक्षा या कांद्यात सल्फरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तो कच्चा खाणे कठीण होतं. शिवाय हा कांदा बराच काळ टिकतो.

पांढरा कांदा (White Onion)

पांढरा कांदा हा कमी प्रमाणात आढळतो. मात्र हा कांदा सगळ्यांच्या परिचयाचा आहे. पांढरा कांदा पिवळ्या कांद्याच्या तुलनेत तिखट, कुरकुरीत आणि स्वच्छ असतो. हा कांदा लवकर खराब होतो. हा कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. (Health)

शॅलोट (Shallot)

याला कांद्याच्या श्रेणीमध्ये मोजलं जाऊ शकतं नाही. पण हा देखील कांद्याचा एक प्रकार आहे. हा एक जंगली कांदा असून याची चव लसणासारखी असते. मोठ्या मोठ्या शेफला हा कांदा वापरायला आवडतो. हा कांदा आकाराने खूप लहान असते.

हेही वाचा: Health Tips: हिवाळ्यात चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा

वेल्श कांदा किंवा हिरवा कांदा (Welsh Onion/Green Onion)

हा हिरवा कांदा पण असतो. हा कांदा हिवाळ्यात खूप खाल्ला जातो. त्याला आलेवादी कांदा असंही म्हणतात.

योग्य कांदा कसा निवडायचा (How to choose the right onion)

बाजारातून कांदा खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. कांदा हा पक्का असावा शिवाय तो मऊ आणि डाग नसलेला असावा. कांद्याची बाहेरची त्वचा कोरडी नसावी. तसंच ते आपल्या हातात जड वाटले पाहिजे आणि कांद्याचा वास नसावा.

कांदा कसा साठवायचा ?

कांदे हा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. तर कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवावे. पण जर तुम्ही एकदा कांदा कापला किंवा सोलून घेतला की तुम्ही तो रेफ्रिजरेटरमध्ये 7-10 दिवस ठेवू शकता. पण त्यांना बटाट्यांपासून दूर ठेवा, कारण त्यामुळे कांद्याला कोंब फुटतात.