
It Is Important To Take Care Of Heart Health: माणसाच्या शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी त्यांना शुद्ध रक्तावाटे प्राणवायू व अन्य पोषक द्रव्ये पुरविली जातात. त्यासाठी रुधिराभिसरण संस्थेत "हृदय' नावाचा अत्यंत कार्यक्षम व स्वयंप्रेरित पंप कार्यरत असतो. हा पंप सतत सुरू असतो. रक्ताभिसरणासाठी हृदयाचे आकुंचन-प्रसरण सतत होत असते. दोन आकुंचनांमधील काही मिलि सेकंदांचा काळ हा हृदयाच्या विश्रांतीचा असतो. तेवढ्या अवधीत हृदयाचे स्नायू ताजेतवाने होतात. या स्नायूंना अखंड काम करण्यासाठी प्राणवायू व पोषक द्रव्ये आवश्यक असतात.