

आरोग्याचे ‘बाळ’कडू: मुलांचा ताप म्हणजे भीती नव्हे, तर संसर्गाविरुद्धची लढाई! डॉ. संजय जानवळे यांनी उलगडली तापाची लक्षणे आणि घरगुती उपाय
Sakal
डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ
अनेक आजारांत ताप येतो. लहान मुलात सर्दी, घसादुखी यासारखे सौम्य आजार हेच तापाचे मुख्य कारण असते. बऱ्याचदा १०२ फॅरनहाईटपेक्षा कमी ताप असल्यास फारसे उपचार करावे लागत नाहीत. तापाचे औषध दिल्यावर अशी मुले बरी होतात. जर ताप दोन ते तीन दिवसांनंतरही कमी होत नसेल, मूल खूपच आजारी असेल, ताप १०४ किंवा त्याहून अधिक असेल आणि बाळाचे वय २ किंवा ३ महिन्यापेक्षा कमी असेल, तर वैद्यकीय सल्ला घेणं अनिवार्य असते.