
What Are The Reasons Of Insomnia: झोप न लागणे, झोपेत वारंवार व्यत्यय येणे, झोप झाल्यावर जागे होताना झोप पुरी झाली आहे, अशी भावना न येणे म्हणजे निद्रानाश. चिंता किंवा तणाव यांनी तात्पुरता निद्रानाश होतो. तो जेव्हा टिकून राहतो तेव्हा थकवा जाणवू लागतो. अशा व्यक्तीला झोपावयाला जाताना आता झोप येणार नाही, या विचाराने अधिकाधिक काळजी वाटू लागते. या काळजीमुळे इतर मनोविकार बळावतात. साधारणपणे 25 टक्के व्यक्तींना केव्हा ना केव्हा निद्रानाश होतो, तर 10 टक्के लोकांना तो दीर्घकाळ टिकतो.