Turmeric For Ear Infection: गुणकारी हळदी! कानाचे दुखणे असो किंवा कोणतंही इन्फेक्शन येईल मदतीला धावून

हळदीतील दाहक-विरोधी गुणधर्म तुमच्या कानाचा संसर्ग बरा करण्यासाठी उपयुक्त आहेत. हळदीचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.
ear
ear sakal

हळदीचा वापर भारतीय जेवणात वापर वर्षानुवर्षे केला जात आहे. हळदीच्या वापराने अनेक रोग लगेच बरे होऊ शकतात. हळदीमध्ये प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, कॅलरीज आणि फायबर हे निरोगी पदार्थांमध्ये आढळतात. तसेच हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीफंगल गुणधर्म देखील असतात, जे इन्फेक्शनमुळे होणाऱ्या अनेक समस्या कमी करण्यास मदत करते.

या मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि ते कानाच्या संसर्गामध्ये देखील हळद वापरली जाऊ शकते. तुमचा कान दुखत असेल किंवा इन्फेक्शन झालं असेल तर तुम्ही त्यासाठी हळदीचा वापर कसा कराल ते जाणून घ्या.

हळद आणि नारळाचे तेल

कान दुखणे आणि इन्फेक्शनमध्ये हळदीच्या पावडरच्या वापराने आराम मिळतो. यामध्ये दाहक- विरोधी गुणधर्म आहेत, जे तुमच्या कानाच्या नसांना अराम देण्यास मदत करतात, त्यासाठी दोन चमचे खोबरेल तेलात एका चमचा हळद पावडर मिसळा.

नंतर हे मिश्रण 4 ते 5 मिनिटे गॅसवर गरम करा. त्यांनतर ते गॅसवरून उतरवा आणि कोमट झाल्यांनतर कानात तेलाचे काही थेंब कापसाच्या साहाय्याने टाका. त्यानंतर कापसाने कानाचे छिद्र कापसाने झाकून टाका.

ear
Garlic Health Benefits: सकाळी रिकाम्या पोटी मध आणि लसूण खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

हळदीचे पाणी

हळदीचे पाणी हे उपाय करण्यासाठी त्यामध्ये एक कप पाणी घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद घालून ते उकळा. हे पाणी नंतर गॅसवरून काढून थोडे कोमट होऊ द्या. त्यांनतर कानामध्ये कोमट पाण्याचे काही थेंब टाका. या पाण्याने कानातल्या घाणीमुळे होणारा त्रास आणि संसर्ग कमी होतो. कानातील मळ मऊ होऊन सहज बाहेर येतो .

Turmeric
Turmeric sakal

हळद आणि लसणाचे तेल

या दोन्हीचे तेल बनवण्यासाठी लसणाच्या 2 ते 3 कळ्या बारीक करा. नंतर एका पॅनमध्ये दोन चमचे खोबरेल तेल टाका. त्यांनतर त्यामध्ये ठेचलेला लसूण आणि थोडीशी हळद घालून गरम करा. साधारण हे तेल चार ते पाच मिनिटे उकळून द्या. नंतर गॅसवरून काढून गाळून घ्या. तुमचा कान दुखत असल्यास या तेलाचे काही थेंब टाका.

Turmeric
Turmeric sakal
ear
White Jamun Benefits: पांढऱ्या जांभळामध्ये आहेत अनेक औषधी गुणधर्म; 7 महत्त्वाचे फायदे येथे जाणून घ्या

कानाच्या अनेक आजारांमध्ये घरगुती उपायांचा अवलंब करू नये. तुम्हाला जर सतत कानात वेदना होत असतील तर कोणत्याही प्रकारचे तेल वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com