
थोडक्यात:
लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण मोबाईल अॅडिक्ट झाले आहेत आणि शॉर्ट-फॉर्म व्हिडिओजना प्राधान्य देतात.
रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ पाहताना मेंदूमधील Reward Pathways दारूसारख्याच वेगाने सक्रिय होतात.
दीर्घकाळ या सवयीमुळे लक्ष केंद्रीत करणे, स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता प्रभावित होते.
How Instagram Reels Affect Your Brain Like Alcohol: सध्या लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल अॅडिक्ट झाले आहेत. त्याचसोबत सद्यस्थितीमध्ये सगळ्यांचा टाइमस्पॅन कमी झाला असून लोक शॉर्ट-फॉर्म व्हिडिओजना प्राधान्य देत आहेत. या अॅडिक्शनचा अर्ध्यापेक्षा जास्त काळ हा इंन्स्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबवरील रील्स बघण्यातच घालवला जातो.
काही संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की, शॉर्ट-फॉर्म व्हिडिओज पाहताना मेंदूतील आनंद देणारे मार्ग म्हणेजच Reward Pathways तवेढ्याच वेगाने अॅक्टिव्ह होतात जेवढ्या वेगाने दारूसारख्या नशेच्या वस्तू वापरताना होतो.
मात्र याचा आपल्या मेंदूवर घातक परिणाम होऊ शकतो असे भारतातील न्यूरोलॉजिस्टनी सांगितले आहे. तज्ज्ञांच्या मते ही सवय निरुपद्रवी वाटली तरी दीर्घकाळात मेंदूवर गंभीर परिणाम करू शकते, ज्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, स्मरणशक्तीही बिघडू शकते.