
Cervical Cancer Prevention Program By Serum Institute and Vidal Health
sakal
Cervical Cancer Prevention Initiative by Serum Institute and Vidal health: गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक संस्था सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि बजाज फिनसव्र्व्हचा भाग असलेली आरोग्यसेवा पुरवठादार विदाल हेल्थ यांनी यासाठी भागीदारी केली आहे.
१ ऑक्टोबरपासून देशभरात हे डिजिटल व्यासपीठ कार्यान्वित होईल. या माध्यमातून महिलांना एचपीव्ही लसीकरणाचा अनुभव कॅशलेस आणि संपूर्णपणे डिजिटल पद्धतीने मिळेल.