कोरानाच्या पार्श्वभूमीवर मधुमेहाच्या रुग्णांसाठी ICMR च्या मार्गदर्शक तत्त्वे

मधुमेहाच्या टाईप -1 रुग्णांसाठी सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
icmr
icmrsakal

मधुमेहाच्या टाईप -1 प्रकाराच्या व्यवस्थापनासाठी सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मधुमेह असलेल्या लोकांना कोरोनाचा जास्त धोका असतो त्यासाठी ICMR ने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. (ICMR released guidelines for the management of type 1 diabetes)

गेल्या दोन वर्षांपासून जगभरात सुरू असलेल्या कोरोना महामारीचा लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झालाय. आधीच वेगवेगळ्या रोगांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये संसर्गाचा धोका जास्त असल्याचे दिसून येते. हृदयविकार, लठ्ठपणा आणि मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना कोरोना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते.

icmr
अल्पसंख्यांक मंत्रालयच इतिहासजमा होणार?

कोरोनाच्या आकडेवारीवरुन असे लक्षात की साथीच्या रोगाने मधुमेहींना म्हणजे ज्यांना शुगरचा त्रास आहे,अशा लोकांना अधिक प्रभावित केले आहे. त्यामुळे अशा लोकांमध्ये गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका वाढला आहे.

जगभरात टाईप-2 मधुमेहाची प्रकरणे अधिक नोंदवली जात असली तरी सर्व प्रकारच्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) यावेळी टाइप 1 मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहे.

icmr
गार पाणी पिताय, थोडं थांबा!

गेल्या चार-पाच दिवसांतील कोविड-19 च्या दैनंदिन आकडेवारीवर नजर टाकली तर असे दिसून येते की, गेल्या तीन महिन्यांत प्रथमच संसर्गाची दैनंदिन आकडेवारी पुन्हा 4000 चा टप्पा ओलांडत आहेत म्हणजे कोराना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना, तज्ञ सर्व लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देतात. कोविड-19 पासून टाइप-1 मधुमेहाच्या रूग्णांना संरक्षणाकरीता ICMR ने काय सूचना दिल्या आहेत, ते जाणून घेऊ या.

1. भारतातल्या तरुणांमध्ये डायबेटिसबद्दचा तणाव वाढत आहे.

2. टाईप-१ डायबेटिस हा लहान मुलं आणि किशोरवयीन

3. डायबेटिसच्या बाबतीत न्याय उपचारपद्धतीसमोर काही आव्हानं आहेत.

4. काही बाबींवर नियंत्रण आल्यास डायबेटिसला नियंत्रणात आणता येतं.

5. चांगल्या पद्धतीनं नियोजन केल्यास आयुष्याची गुणवत्ता सुधारते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com