
सध्या कोरोनाची लाट नाही; अभ्यासकांचा दावा
गेल्या आठवड्यापासून कोरोना आकडेवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. ताज्या आणि सक्रिय प्रकरणांमध्ये दुप्पट वाढ झाल्याने देशात चिंतेचे वातावरण आहे.अशात IIT कानपूरच्या तज्ञांनी एका अभ्यासातून सांगितले की जोपर्यंत कोरानाची नवे वेरीअंट समोर येत नाही तोपर्यंत घाबरण्याचे कारण नाही. सध्याच्या कोरोना संक्रमणाला लाट म्हणता येणार नाही, असेही ते म्हणाले. (IIT Kanpurs' statement on active cases have doubled in up in the past week in india)
एका गणितीय मॉडेलच्या अभ्यासक्रमातून IIT कानपूरच्या तज्ञांना हि बाब निदर्शनास आली.या संदर्भात बोलताना IIT कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल म्हणाले “कोरोना रुग्णसंख्येतील लक्षणीय वाढ ही प्रामुख्याने कोरोनाविरूद्ध नॅचरल प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे झाली आहे.त्यामुळे या कोरोना संक्रमणाला कोरोनाची नवी लाट म्हणू नये.”पुढे ते म्हणाले,
"कोरोना संसर्ग पुन्हा होऊ शकतो परंतु काळजी करण्याची गरज नाही. सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.अखेरीस, तुम्हाला कोरोनाव्हायरस एक सामान्य फ्लू वाटेल.” असेही ते म्हणाले.
देशात दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख वाढत आहे. देशात रुग्णसंख्येतली वाढ ही कायम आहे. आज देशात १३,२१६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तर ८,१४८ रुग्ण आज कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात ६८,१०८ अॅक्टीव्ह रुग्ण आहे तर डेली पॉझिटिव्ह रेट २.७३ टक्के आहे.
वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनानेही पुन्हा अलर्ट होत आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत तर आरोग्यमंत्र्यांकडूनही लोकांना मास्क वापरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
Web Title: Iit Kanpurs Statement On Active Cases Have Doubled In Up In The Past Week In India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..