गर्भधारणेदरम्यान ड जीवनसत्त्व महत्वाचे का आहे ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pregnancy

गर्भधारणेदरम्यान ड जीवनसत्त्व महत्वाचे का आहे ?

मुंबई : गरोदरपणात ड जीवनसत्त्व महत्त्वाचे आहे की नाही याबाबत सांगत आहेत डॉ. मंजिरी काबा सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, मसिना रुग्णालय.

१. एखाद्याने स्त्रीने गरोदरपणात ड जीवनसत्त्व किती घ्यावे ?

कॅल्शियमचे योग्य पोषण, हाडांचे सामान्य आरोग्य आणि स्केलेटल होमिओस्टॅसिससाठी ड जीवनसत्त्वाचे सेवन आवश्यक आहे. गर्भधारणेदरम्यान, ड जीवनसत्त्व गर्भाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी तसेच सामान्य रोपण आणि एंजियोजेनेसिसशी संबंधित जनुकांच्या नियमनासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करताना ड जीवनसत्त्वाचे दररोजचे सेवन ६०० IU/दिवस आहे. शाकाहारी असणे, सूर्यप्रकाशाच्या मर्यादित संपर्कात असलेल्या आणि दुग्धजन्य पदार्थ टाळणार्‍या महिलांना त्यांना सीरम २५-हायड्रॉक्सी -डी पातळीची आवश्यकता असू शकते आणि त्यांना ड जीवनसत्त्व सप्लिमेंट्सचे जास्त डोस घ्यावे लागू शकतात.

हेही वाचा: उशिराने गर्भधारणा करायची असल्यास egg fridging आवश्यक

२. एखाद्या स्त्री'ला गरोदरपणात अतिरिक्त ड जीवनसत्त्व घ्यावे लागेल का?

अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की गर्भधारणेदरम्यान ड जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी असणे सामान्य आहे आणि तेही अशा रूग्णांमध्ये जे दररोज 400 IU ड जीवनसत्त्व असलेले प्रसवपूर्व जीवनसत्त्वे घेतात. उच्च जोखीम असलेल्या रूग्णांसाठी गरोदर असताना ड जीवनसत्त्वाच्या पातळीचे मूल्यांकन करणे चांगले ठरेल, जेणेकरून पुरेसा पूरक आहार घेता येईल.

३. कोणत्या पदार्थांमध्ये ड जीवनसत्त्व असते ?

ड जीवनसत्त्व आपल्या त्वचेच्या सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात आल्याने उत्तम प्रकारे प्राप्त होते. दुपारच्या सूर्यप्रकाशात २०-३० मिनिटांसाठी हात आणि चेहऱ्याचा थोडासा भाग जरी संपर्कात आला तरी पुरेसा असू शकतो. ज्यांची त्वचा गडद आहे अश्या लोकांनी दीर्घकाळ सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहण्याची आवश्यकता असू शकते.

ड जीवनसत्त्वाने समृद्ध असलेले पदार्थ म्हणजे तेलकट मासे जसे की सॅल्मन आणि मॅकेरल, यकृत, अंडी (पिवळा भाग) आणि अळंबी. दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध आणि चीज जे ड जीवनसत्त्वयुक्त आहेत ते देखील ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी एक चांगले स्त्रोत आहेत.

Web Title: Importance Of Vitamin D During Pregnancy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :pregnancy
go to top