
तुळशी विवाह झाला की उपवरांच्या लग्नाचा मार्ग मोकळा होतो. जसे धार्मिकदृष्ट्या तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे तेवढेच महत्त्व तिच्या औषधी गुणधर्मामुळेही आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस गुणकारी आहे. आयुर्वेदातही तुळशीची पाने, बिया, मंजुळा, खोड यांना महत्त्व आहे. त्यामुळेच प्रत्येक अंगणी तुळस विराजमान असली पाहिजे.