Improve Concentration : हाता-तोंडाशी आलेलं यश निसटतंय? या उपायांनी वाढवा फोकस अन् व्हा यशस्वी

बऱ्याच जणांना कामावर लक्ष केंद्रीत करणं, फोकस करण्यासा प्रोब्लेम होतो.
Improve Concentration
Improve Concentrationesakal

Personality Development Tips To Improve Concentration : कोणतंही काम करण्यासाठी फोकस म्हणजेच एकाग्रतेची आवश्यकता असते. त्यामुळे प्रत्येकाला आपले काम एकाग्रतेने करायचे असते. पण कधी कधी लक्ष भरकटतं आणि एग्रता राहत नाही. त्यामुळे काम बिघडतात. आणि बऱ्याचदा हाता-तोंडाशी आलेलं यशही निसटतं. शिवाय काम करण्यासाठी जास्त वेळही लागतो.

त्यामुळे सहाजिकच ताण वाढणे, नैराश्य येणे असे घडते. पण दुसरी बाजू विचार केली तर मन एकाग्र न होण्यामागेही अति विचार करणे, ताण, नैराश्य या गोष्टी असू शकतात. पण या सगळ्यातून बाहेर पडून एकाग्रता वाढवण्यासाठी उपाय जाणून घेऊया.

Improve Concentration
Improve Concentrationesakal

काम पूर्ण कारा

जेव्हा तुम्ही एखादे काम करणार असाल तेव्हा आधी ते काम नीट समजून घ्या. त्याचा उद्देश काय आहे ते जाणून घ्या. कामाचा उद्देश, त्यातून होणारा फायदा हे नीट समजून घेतलं की, कामाची दिशा समजेल. यामुळे लक्ष केंद्रित व्हायला मदत होईल.

ओव्हर थिंकींग

बऱ्याचदा आपण नको त्या गोष्टींवर ओव्हर थिंकीग करत असतो. त्यामुळे ज्यावेळी जे काम करत असाल त्याचाच विचार करा. इतर गोष्टींचा विचार करू नका. कामांचे नियोजन करून काम केले तर त्याचा ताण येत नाही. त्यामुळे या कामानंतर कोणते काम करायचे हे ठरवलेलं असू द्या. एकावेळी एका ठिकाणीच लक्ष केंद्रीत करा.

Improve Concentration
Attractive Personality : या राशींचे लोक असतात फार आकर्षक, तुमची रास?
Improve Concentration
Improve Concentrationesakal

कामाची जागा

काही वेळा आपण कामाची जागा निवडताना चुकता. कामाची जागा अशी निवडावी जिथे कमीत कमी डिस्ट्रॅक्शन असेल. बऱ्याचदा खूप आवाज, गोंधळ, सतत कोणाची न कोणाची ये-जा अशा ठिकाणी कामात फोकस करणं शक्य होत नाही. त्यामुळे शांत जागेची निवड करावी.

चांगली झोप

जेव्हा आपली झोप नीट होते तेव्हा मन, शरीर सर्वच फ्रेश असते. पण झोप नीट झाली नाही तर थकवा, आळस जाणवतो. त्यासाठी चांगली झोप होणे हे सुद्धा एकाग्रता वाढवण्यासाठी फार आवश्यक आहे.

Improve Concentration
Personality Test : तुमचे मित्र खरे आहेत का? ओळखा या 8 सवयींवरून

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com