Dengue Fever : पावसाळा सुरू होताच वाढतो डेंग्यूचा धोका, लक्षणे वाचा अन् असा करा बचाव

डेंग्यूपासून स्वत:चा बचाव कसा करण्यासाठीचे काही सोपे उपाय जाणून घेऊयात.
Dengue Fever
Dengue Fever esakal

Dengue Fever : पावसाळ्याला सुरुवात झाली की सगळीकडे डासांचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूची प्रकरणं वाढतात. डेंग्यू व्हायरस एडिज प्रजातीच्या डासामुळे मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो. तेव्हा डेंग्यूपासून स्वत:चा बचाव कसा करण्यासाठीचे काही सोपे उपाय जाणून घेऊयात.

डेंग्यूची लक्षणं

ताप, डोकेदुखी, अंग दुखणे, मुंग्या येणे आणि थकवा जाणवणे यांसारखी लक्षणे तुम्हाला डेंग्यूच्या आजारात दिसून येतात. डेंग्यू आजाराचे निदान वेळीच झाले नाही तर रूग्णाचा जिवही जाऊ शकतो.

१. डासांचा वाढता प्रादुर्भाव कसा रोखाल

डेंग्यूचा आजार पसरवणारा एडिज डास साचलेल्या पाण्यात वाढतो. तेव्हा तुमच्या घरात या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराभोवती किंवा घराच्या आत जिथे कुठे पाणी साचले असेल ती जागा आधी स्वच्छ करा. आणि तिथे पाणी साचू देऊ नका. तसेच घराजवळची नाली किंवा पाणी वाहणारे पाइप स्वच्छ करा.

Dengue Fever
Dengue Precautions : वर्षभरानंतर पाणी मिळाले तरी अंड्यातून पुन्हा अळी तयार! डेंग्यूची अशी घ्या खबरदारी

२. किटकनाशक औषधांची फवारणी

डास चावू नयेत म्हणून डास दूर पळवणारी क्रीम वापरा. ज्यामुळे डासांचा प्रभाव कमी होईल. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला भरपूर डास असतील तर तुम्ही त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करणारी क्रीम वापरायला हवी. त्यात Deet, पिकारिडिन, सिट्रोनेला आणि लिंबू, निलगिरीच्या तेलाचा समावेश असायला हवा.

३. फुल स्लीव्ह्जचे कपडे घाला

मुलांना लाँग स्लीव्ह्जचे कपडे घालून द्या आणि तुम्हीसुद्धा घाला. फिकट रंगाचे कपडे डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत करेल. (Dengue)

Dengue Fever
Dengue Disease: शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती; NMCची जनजागरण मोहीम

४. खिडक्या दरवाजे बंद करा

डासांना घरात येण्यापासून रोकण्यासाठी सायंकाळ होताच खिडक्या, दरवाजे बंद करा. झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. याशिवाय घरात थंड वातावरण ठेवा. पंखे, एअर कंडिशनरचा वापर करा. ठंड्या वातावरणात डासांचा प्रादुर्भाव कमी होतो.

५. सायंकाही बाहेर जाताना विशेष काळजी घ्या

सायंकाळच्या वेळी डास जास्त सक्रिय असतात त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी साचलेले असेल अशा ठिकाणी जाणे टाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com