Dengue Disease: शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती; NMCची जनजागरण मोहीम

Dengue fever
Dengue feversakal
Updated on

Dengue Disease : दमदार पावसाला अजून सुरवात होत नाही तोच शहरात डेंगीची भीती निर्माण झाली आहे.

शहरात डेंगीचा आकडा शंभराच्या वर पोचला असून, त्याअनुषंगाने महापालिकेकडून डेंगींसह चिकूनगुनिया मलेरिया व कीटकजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर जनजागरण मोहीम हाती घेतली आहे. (Fear of dengue outbreak in city nashik)

शहरात जानेवारी महिन्यात १७, फेब्रुवारी महिन्यात २८, मार्च महिन्यात २८, एप्रिल महिन्यात ८, मे महिन्यात ९, तर जून महिन्यात १३, असे डेंगीचे १०३ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला खडबडून जागी झाली असून, त्याअनुषंगाने जनजागरण मोहीम हाती घेतली आहे.

जनजागरण मोहिमेच्या अनुषंगाने महापालिकेने घर व परिसरात पावसाचे पाणी साठणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

पाण्याच्या टाक्या, रांजण, ओवर हेड टॅंक आठवड्यातून एकदा स्वच्छ करावी फ्रिज मागील ट्रे, कुलर, फिश टॅंक, एअर कंडिशनर, लिफ्टमध्ये पाणी साठणार नाही यासंदर्भात काळजी घ्यावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dengue fever
Dengue Patients : डेंगीच्या रुग्णसंख्येत जूनमध्ये वाढ! 6 महिन्यात रुग्णांची संख्या शंभरी पार

त्याचप्रमाणे चायनीज बांबू, मनी प्लांट, फुलदाणी आदी शोभिवंत झाडांमधील पाणी दिवसाआड बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छ पाणी साचेल, अशी ठिकाणे नष्ट करण्याचे आवाहन केले आहे.

टेरेस किंवा गॅलरीत कोणत्याही प्रकारचे भंगार वस्तू, जुने डबे, टायर्स, नारळाच्या करवंट्या ठेवू नये. अशा वस्तूंची विल्हेवाट लावावी. नवीन बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचू नये. तसेच, बेसमेंटमधील पाणी काढून टाकण्याच्या सूचना वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

Dengue fever
NMC Tax Recovery: थकबाकीचा बोजा कमी करण्यासाठी 6 टप्प्यात वसुली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.