Blood Circulation Disorders : रक्ताभिसरणाच्‍या आजारांमुळे सर्वाधिक मृत्यू; हृदयरोग आणि रक्तवाहिन्यांवर ताण येण्याच्या घटनांमध्ये वाढ

Most common causes of death due to circulatory problems: राज्यात रक्ताभिसरण प्रणालीच्या आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असून हृदयरोग व धमनी तणाव हे प्रमुख कारण ठरत आहेत.
Most common causes of death due to circulatory problems
Most common causes of death due to circulatory problemsesakal
Updated on

थोडक्यात:

  1. रक्ताभिसरण प्रणालीशी संबंधित आजार हे गंभीर आरोग्य समस्या निर्माण करतात, विशेषतः हृदय व मेंदूवर परिणाम करतात.

  2. या आजारांची लक्षणे सुरुवातीला लपून राहतात, त्यामुळे वेळेत निदान न झाल्यास धोका वाढतो.

  3. राज्यात सर्वाधिक मृत्यू हे अशा रक्ताभिसरणाच्या विकारांमुळे होत आहेत.

How heart diseases affect blood vessels: रक्ताभिसरण प्रणालींशी संबंधित आजार सध्या आरोग्यविषयक गंभीर प्रश्न ठरत आहे. हृदय आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या या आजारांमुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, उच्च रक्तदाब यांसारख्या शारीरिक समस्‍या निर्माण होतात. या आजारांची लक्षणे अनेकदा लपून राहतात आणि वेळेत निदान न झाल्यास त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. राज्‍यात सर्वाधिक मृत्‍यू या आजारांमुळे होतात.

या आजारांमध्‍ये अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस हा सर्वांत सामान्य प्रकार असून, यामध्ये धमन्यांमध्ये चरबीसदृश थर (प्लेक) साचतो. परिणामी रक्तप्रवाहात अडथळा येतो. त्यामुळे हृदयाला, मेंदूला व हातपायांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांवर परिणाम होतो. धमनीचा आकार वाढत असताना या स्थितीत धमनीची भिंत कमकुवत होते आणि ती फुगून फुटण्याचा धोका वाढतो.

रक्‍ताभिसरण प्रकियेत दोष निर्माण झाल्‍याने हृदयाचे ठोके अनियमित होतात. याचबरोबर हृदयाच्या झडपांचा दोष, कार्डिओमायोपॅथी (हृदय स्नायूंचा आजार) हेदेखील गंभीर विकार मानले जातात. जन्मजात हृदयरोगही एक चिंतेचा विषय असून, अनेक नवजात बालकांना जन्मत:च हृदयातील छिद्र, झडपातील दोष किंवा रक्तवाहिन्यांच्या रचनेत बदल असतो.

Most common causes of death due to circulatory problems
Heart Attack in Kids: लहान मुलांना खरंच हार्ट अटॅक येतो का? तज्ज्ञ सांगतात...

उच्च किंवा कमी रक्तदाब तसेच मेंदूला रक्तपुरवठा थांबणाऱ्या स्थितीमुळे उद्‌भवणारा स्ट्रोक, हेदेखील रक्ताभिसरण प्रणालींशी संबंधित प्रमुख आजार आहेत. धाप लागणे, छातीत दुखणे, थकवा, सूज येणे, चक्कर येणे व अनियमित हृदयाचे ठोके अशी या विकारांची लक्षणे असू शकतात. काही वेळा ही लक्षणे धोक्याची ठरू शकतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे, अशी माहिती हृदयरोगतज्‍ज्ञ देतात.

या उपचारांमध्ये औषधोपचार, अँजिओप्लास्टी, झडप बदलणे, शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. प्रतिबंधासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान व तंबाखूचे टाळणे, तसेच नियमित आरोग्य तपासणी उपयुक्त ठरते.

काय काळजी घ्याल?

  • कमी मीठ व कमी चरबी असलेले

  • अन्न खावे

  • रक्ताभिसरण योग्‍य राहण्‍यासाठी रक्‍तदाब नियंत्रणात असावा

  • रक्ताभिसरण आजारांवर त्‍वरित निदान करून उपचार घ्यायला हवेत.

Most common causes of death due to circulatory problems
Fatty Liver to Liver Cancer: फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष करू नका; हेच ठरू शकतं लिव्हर कॅन्सरचं पहिलं पाऊल! तज्ज्ञांनी दिला इशारा

रक्‍ताभिसरण प्रक्रियेच्या दोषामुळे अनेक अवयवांत अडथळा येतो. हृदयाच्या रक्‍तवाहिन्‍यांत अडथळा आला तर हृदयविकार, मेंदूच्या रक्‍तवाहिन्‍यांत आला तर पक्षाघात, किडनीच्‍या प्रकियेत आल्‍यास किडनी निकामी होणे व पायाला झाला तर गँगरीन होतो. हे जीवनशैलीविषक आजार आहेत. त्‍यासाठी आपला योग्‍य आहार व व्‍यायाम करणे गरजेचे आहे. चुकीच्‍या आहारामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. बेकरीचे पदार्थ, जंक फूड कमी खावेत. तंबाखूजन्य पदार्थ पूर्णपणे टाळायला हवेत.

- डॉ. अभिजित पळशीकर, संचालक, हृदयरोग विभाग, सह्याद्री रुग्‍णालय

FAQs

1. रक्ताभिसरण प्रणाली म्हणजे नेमकी काय?
(What is the circulatory system?)
रक्ताभिसरण प्रणाली ही शरीरातील हृदय, रक्त आणि रक्तवाहिन्यांची एक यंत्रणा आहे, जी संपूर्ण शरीराला ऑक्सिजन व पोषणद्रव्यांचा पुरवठा करते.

2. रक्ताभिसरण प्रणालीशी संबंधित सामान्य आजार कोणते?
(What are common diseases related to the circulatory system?)
अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस, हृदयविकार, उच्च/कमी रक्तदाब, स्ट्रोक, कार्डिओमायोपॅथी, झडपातील दोष आणि जन्मजात हृदयरोग हे प्रमुख आजार आहेत.

3. अशा आजारांची लक्षणं कोणती असतात?
(What are the symptoms of circulatory system disorders?)
धाप लागणे, छातीत दुखणे, थकवा, सूज येणे, चक्कर येणे, अनियमित हृदयाचे ठोके ही लक्षणे दिसू शकतात.

4. या आजारांपासून बचाव करण्यासाठी काय करावे?
(How can one prevent circulatory system diseases?)
संतुलित आहार, नियमित व्यायाम, तंबाखू व धूम्रपान टाळणे, कमी मीठ व चरबीचे अन्न सेवन करणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे उपयुक्त ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com