Fungal Disease : हवामान बदलाने वाढतायेत फंगल आजार, WHO ने दिली चेतावनी

हवामान बदलाने पृथ्वीचं तापमान हळूहळू वाढत आहे. त्यामुळेच त्वचा रोग आणि फंगल इन्फेक्शनचे आजार वाढत आहेत.
Fungal Disease
Fungal Diseaseesakal

Increasing Fungal Disease due to Climate Change WHO Warning : ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानात बदल होत आहे. ज्यामुळे तापमानात दरवर्षी वाढ होत आहे. यात चिंतेची बाब म्हणजे जगभरात आजवर केवळ चार प्रकारचे अँटीफंगल औषधे आहेत. वाढत्या फंगल इंफेक्शन्सच्या आजारांचा अंदाज घेत जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने १९ प्रकारच्या फंगल आजारांची लिस्ट समोर आणली आहे. हे आजार माणसांसाठी मोठा धोका आहेत.

WHO ने सांगितलं आहे की, बवामान बदलामुळे फंगस विस्तारीत होत आहे. कोरोनानंतर खूप आजार पसरत आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना बोधा होत आहे. या लिस्टमुळे जास्तीत जास्त लोकांना याची माहिती मिळावी असा उद्देश आहे.

Fungal Disease
Health Tips : हिवाळ्यात मूळा खा; अन् असाध्य आजारावर मिळवा नियंत्रण

या आजारांचा हाय रिस्क, मध्यम आणि महत्वपूर्ण या आधारावर तीन भागात वर्गिकरण करण्यात आलं आहे. या यादीत क्रिप्टोकोकस, कँडीड, ऑरिस आणि अ‍ॅस्परगिलस फ्यूमिगेट्स या आजारांना गंभीर श्रेणीत ठेवण्यात आलं आहे.

Fungal Disease
Health Tips : आजारतून सुटका करण्यासाठी महागड्या औषधांपेक्षा जेवणात करा तांब्या- पितळच्या भांड्याचा समावेश

कमी रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्यांना धोका अधिक

WHO ने सांगितलं आहे की, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांना फंगल इन्फेक्शनचा धोका अधिक आहे. ज्यांना एचआयव्ही, कँसर, लीव्हर किंवा किडनीचा आजार आहे, त्यांना धोका वढतो. कोरोनामुळे लोकांची रागप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने हा धोका वाढला आहे. कोरोनानंतर फंगल इन्फेक्शनचे रुग्ण वाढल्याचं दिसत आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com