Radish Health Tips : हिवाळ्यात मूळा खा; अन् असाध्य आजारावर मिळवा नियंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Radish Health Tips

Health Tips : हिवाळ्यात मूळा खा; अन् असाध्य आजारावर मिळवा नियंत्रण

दिवाळी संपली आणि थंडी पडायला सुरूवात झाली आहे. थंडीत स्वेटर, कानटोपी घालून चुलीसमोर बसणे अनेकांना आवडते. हिवाळ्यात गरम पदार्थ खावेसे वाटतात. वातावरणामूळे शरीरात उष्णता रहावी यासाठी डॉक्टरही गरम पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. हिवाळ्यात अनेक हिरव्या पालेभाज्या पिकतात.त्यामूळे घरात रोज नाश्त्याला पराठे बनवले जातात.

हेही वाचा: Health Tips : आजारतून सुटका करण्यासाठी महागड्या औषधांपेक्षा जेवणात करा तांब्या- पितळच्या भांड्याचा समावेश

पंजाबमध्ये सर्वात प्रसिद्ध असलेला पराठा म्हणजे मुळ्याचा पराठा. हा पराठा लोणी, दही, लोणचे आणि भाजीसोबत खाल्ला जातो. मुळा हा साधारणपणे पराठा किंवा सॅलडमध्ये खाल्ला जातो. पण अनेकांना मूळा आवडत नाही. अनेक कारणे देऊन लोक मूळा खायला नकार देतात. पण तुम्हाला माहित आहे का की मूळा तुमच्या आरोग्यासाठी वरदान आहे. मुळ्याच्या सेवनाने तुम्ही अनेक मोठ्या आजारांवर नियंत्रण मिळवू शकता.

हेही वाचा: Health Tips: मुड बुस्टअप करण्यासाठी ट्राय करा 'या' सिंपल टिप्स

मधुमेह नियंत्रित करतो.

रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रितपणे वाढते आणि इन्सुलिन कमी होते तेव्हा मधुमेहाचा त्रास सुरू होतो. मधुमेह टाईप-१, टाईप-२ हा आजार वेळेवर उपचार न केल्यास प्राणघातकही ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मुळा हे एका औषधाप्रमाणे काम करते. मूळ्यातील गुणधर्मांचे श्रेय अॅडिपोनेक्टिनला दिले जाते. मुळ्यामधील बायोएक्टिव्ह कंपाऊंड हे ग्लुकोज होमिओस्टॅसिसला सपोर्ट करते.

हेही वाचा: Health Tips : गवतावर अनवाणी चालल्याने होतात फायदे, दररोज चाला इतके तास

पचनसंस्थेसाठी चांगला

चायनिज, मसाल्याचे पदार्थ, शिळे अन्न खाल्ल्याने पोटात गॅस होण्याची समस्या जाणवते. अशावेळी पोट साफ होत नाही आणि परिणामी मुळव्याधचा त्रासही होतो. या त्रासापासून बचावासाठी मूळा फायदेशीर ठरतो. मुळ्यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते. जे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टसाठी चांगले आहे. पचन प्रक्रियेला गती देण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी देखील मदत करू शकते.

हेही वाचा: Health Care Tip : सौम्य तापाकडे करू नका दुर्लक्ष ; असू शकते गंभीर आजाराची सुरूवात

अँटीकॅन्सर गुणधर्म

डॉक्टर म्हणतात की मूळ्यामध्ये कँसरविरोधी गुणधर्म असतात. एका अभ्यासानुसार, मुळ्यामध्ये असे गुणधर्म असतात जे पाण्यासोबत मिक्स झाल्याने आयसोथियोसायनेटमध्ये मोडतात. ज्यामुळे शरीरातील कँसरच्या गाठी बाहेर पडण्यास व शरीरात पसरण्यास मदत होते.

हेही वाचा: Winter Health Tips: हिवाळ्यात त्वचेच्या आरोग्यासाठी डिंकाचे लाडू खा, वाचा रेसिपी

रक्तदाबावर नियंत्रण

आजकाल प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती असा असतो. जो हृदयविकाराचा सामना करत आहे. या गंभीर आजारावरही मूळा फायदेशीर आहे. मुळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवते. त्यातील गुणधर्म हे अँथासायनिन म्हणून ओळखले जातात. जे रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास आणि शरीरात रक्त पुरवठा वाढविण्यास मदत करते.