Youth lung Damage
esakal
Air Pollution India : जगातील काही सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी भारतामध्येही अशी काही शहरे आहेत आणि त्याचा सर्वाधिक फटका देशातील युवकांना व बालकांना बसत आहे. त्यामुळे युवक, प्रौढ, नवजात बाळे आणि मुलांना सततचा दम लागणे, दीर्घकालीन खोकला, तीव्र दमा वाढीचे झटके आणि लवकर हृदयविकाराबाबतचा ताण येणे या प्रकारच्या रुग्णांची संख्या वेगाने रुग्णालयांमध्ये वाढत आहे. जो विषय आधी पर्यावरणापुरता मर्यादित होता, तो आता आरोग्य (Youth lung Damage) आणीबाणीमध्ये बदलला आहे. याद्वारे तरुण भारत कसा श्वास घेतो, वाढतोय आणि जगतो यावर परिणाम करणारी समस्या ठरत आहे.