Amla Benefits : बहुगुणी आवळा ; आरोग्य, आयुर्वेदिक औषध निर्मिती व प्रक्रिया उद्योगांना मिळतेय चालना

वर्षभराच्या नैसर्गिक शरीर संवर्धनासाठी सर्वाधिक उपयुक्त असलेला आवळा खऱ्या अर्थाने परिपूर्ण फळ मानले पाहिजे
Amla Benefits
Amla BenefitsSakal

सोलापूर : वर्षभराच्या नैसर्गिक शरीर संवर्धनासाठी सर्वाधिक उपयुक्त असलेला आवळा खऱ्या अर्थाने परिपूर्ण फळ मानले पाहिजे. कोणतीही प्रक्रिया केल्यानंतर पोषक तत्त्वे कायम ठेवणारा आवळा हा प्रक्रिया उद्योगाला चालना देणारा आहे. अजूनही वर्षभर आवळ्याच्या प्रक्रिया उत्पादनांची मागणी बाजारपेठेत कायम असते. आवळा हा आरोग्य, आयुर्वेद औषध निर्मिती व प्रक्रिया उद्योगाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू बनला आहे. या फळाने भारतीय बाजारपेठेला नवी ओळख देण्याची संधी समोर आणली.

तारुण्य टिकवणारे फळ

‘वयःस्थापनानां श्रेष्ठम्‌’ म्हणजे तारुण्य टिकविण्यास मदत करणाऱ्या द्रव्यांमध्ये आवळा श्रेष्ठ समजला जातो. वाढत्या वयामुळे शरीराची झीज होणे स्वाभाविक असते. पण ही झीज कमीत कमी व्हावी, धातूंची संपन्नता टिकून राहावी यासाठी मदत करणारी द्रव्ये म्हणजे वयःस्थापन द्रव्ये. आवळ्याप्रमाणे शतावरी, गोक्षुर, अश्‍वगंधा अशी द्रव्ये वयःस्थापन करणारी असतात. त्यात आवळा सर्वश्रेष्ठ सांगितला आहे. याच कारणासाठी आवळा अनेक रसायनांमध्ये वापरला जातो.

आवळा प्रक्रिया उद्योगाची यशस्विता

दारफळ (ता. माढा) येथील नवदुर्गा महिला बचत गटाच्या प्रमुख अपर्णा देशमुख यांनी सांगितले की, ‘आरोग्य सखी’ म्हणून काम करताना महिलांचे आरोग्याचे प्रश्न अभ्यासले. त्यामध्ये आवळा हा पित्त, पचनविषयक समस्यांवर रामबाण उपाय आहे. आम्ही आवळा कॅंडी, सुकी व ओली सुपारी, मोरावळा तयार करून त्याची विक्री करतो. सेंद्रिय आवळ्याची निवड प्रक्रियेसाठी करतो. वर्षभरात अंदाजे २५ हजार रुपयांच्या उत्पादनांची विक्री होते.

षड्‌रसापैकी पाच गुणांचा समावेश

आयुर्वेदाने सांगितलेल्या अन्नामध्ये षड्‌रस (सहा रस) असावेत, ही संकल्पना आहे. तुरट, खारट, आंबट, मधुर, तिखट व कडू हे सहा रस आहेत. या सहा रसांपैकी पाच रस असलेला आवळा एकमेव फळ आहे.

आयुर्वेदिक औषध निर्मितीत उपयोगी

वैरागच्या साई आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त व योग विभागप्रमुख डॉ. मानसी कुलकर्णी यांनी सांगितले की, आवळा हे एकमेव फळ आहे की, जे उकडले, वाळवले तरी त्यातील पोषण घटक कायम राहतात. हे फळ म्हणजे इम्युनिटी बूस्टर आहे. हृदयरोग, यकृताचे विकार, कर्करोग अशा अनेक आजारांना रोखण्यासाठी सहाय्यभूत ठरतो. म्हणून आयुर्वेदात त्याचा रसायन (टॉनिक) म्हणून औषध निर्मितीत उपयोग होतो.

आवळ्याच्या १०० ग्रॅम गरातील घटक (मिलिग्रॅममध्ये)

व्हिटॅमिन सी : ७२०

आर्द्रता : ८१.२

प्रोटिन्स : ०.५

स्निग्धता : ०.१

खनिज द्रव्ये : ०.७

कार्बोहायड्रेट्स : १४.१

कॅल्शिअम : ०.०५

फॉस्फरस : ०.०२

लोह : १.२

निकोटिनिक ॲसिड : ०.२

(याशिवाय गॅलिक ॲसिड -

आवळ्यापासून तयार होणारी उत्पादने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com