
ऐतिहासिक! देशात आढळला जगातला सर्वात दुर्मीळ ब्लड गृप
भारतात पहिल्यांदाच एका नव्या ब्लड गृपचा शोध लागला आहे. हा ब्लडगृप संपूर्ण जगात दुर्मीळ आहे. गुजरातमधल्या एका ६५ वर्षीय व्यक्तीचा हा ब्लडगृप आहे. हा व्यक्ती हृदयविकाराचा रुग्ण आहे. (Rare blood Group found in Gujarat)
हेही वाचा: उपवास करणाऱ्यांना कोरोनाचा धोका कमी; तज्ज्ञांचं महत्त्वाचं निरीक्षण
या व्यक्तीचा ब्लडगृप EMM निगेटिव्ह असा आहे. या व्यक्तीचा रक्तगट A,B,O किंवा AB यापैकी कोणताही आढळला नाही. साधारणपणे मानवी शरीरात चार रक्तगट आढळून येतात. तसंच EMM चं प्रमाण जास्त असलेले ३७५ अँटिजेन आहेत. मात्र जगात असे फक्त १० व्यक्ती आहेत, ज्यांच्या रक्ता EMM असलेले अँटिजेन नाहीत. ज्यामुळे ते इतर मानवांपेक्षा वेगळे ठरतात. असा रक्तगट असलेले लोक ना रक्त देऊ शकतात ना कोणाकडून रक्त घेऊ शकतात.
हेही वाचा: कोरोनाची दहशत कायम! पुन्हा पुन्हा संक्रमित करणारा नवा व्हेरिएंट
आत्तापर्यंत अशा ब्लडगृपचे ९ लोक सापडले होते. पण आता गुजरातमधल्या राजकोटमध्ये EMM निगेटिव्ह ब्लड गृपचा एक व्यक्ती सापडला आहे. समर्पण रक्तदान केंद्राचे प्रमुख सन्मुख जोशी यांनी सांगितलं की ६५ वर्षीय रुग्णावर हृदयविकारासाठीचे उपचार सुरू आहेत. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला रक्ताची गरज होती. मात्र त्याला लागणारं रक्त कुठेच मिळत नव्हतं. तपासणीनंतर आढळलं की त्याचं रक्त कोणत्याही ब्लड गृपशी जुळत नाही. त्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने अमेरिकेत पाठवण्यात आले.
हेही वाचा: पावसाळ्यात लहान मुलांना हे आजार होऊ शकतात?
त्यावेळी लक्षात आलं की, या व्यक्तीचा ब्लडगृप हा जगातला सर्वात दुर्मीळ रक्तगट आहे. अशा प्रकारचा ब्लड गृप असलेली ही जगातली दहावी आणि देशातली पहिलीच व्यक्ती आहे. रक्तात EMM कमी असल्याने या रक्तगट प्रकाराला EMM निगेटिव्ह असं नाव देण्यात आलं आहे.
Web Title: Indias First And Worlds Tenth Unique Blood Group Found In Gujarat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..