Monsoon 2022: पावसाळ्यात लहान मुलांना हे आजार होऊ शकतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fever,cold

पावसाळ्यात लहान मुलांना हे आजार होऊ शकतात?

मान्सूनमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठीच्या टिप्स (Monsoon health tips) : पावसात होणाऱ्या संर्सगजन्य आजारांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टीची खबरदारी घ्यावी. पावसाळा सुरू झाल्याने गरमीला टाटा म्हणत नागरिक पावसाळ्यात काहीसा दिलासा मिळण्याची आशा असते. पण मात्र पावसाळ्या हा या आल्हाददायक वातावरणासोबतच अनेक आजारांचा धोकाही सोबत घेऊन येतो. विशेषत: लहान मुलांचा विचार केला तर भीती अजून वाढते. कारण पावसाळ्यात रोग आणि संसर्ग तर पसरतातच, पण सोबत हवामानातील आर्द्रतेमुळे अनेक नवीन जिवजंतूही वाढू लागतात. आणि पावसाळ्यातील ओलसर वातावरण हे या जिवजंतुच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते, ज्यामुळे रोगांचा धोका अधिक वाढतो.

सर्दी आणि ताप : पावसाळ्यात सर्दी, फ्लू यांसारखे हवेतून पसरणारे अनेक आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. पावसाळ्याच्या काळात वातावरणात अचानक बदल होतात. त्यामुळे सर्दी आणि ताप येणे हे खूप सामान्य आहे. पण, ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, अशा लोकांच्या आरोग्यावर फ्लू किंवा इन्फ्लूएंझा विषाणूचा हल्ला सहज होऊ शकतो. फ्लू हा असा रोग आहे, जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. सौम्य ताप येणे, सर्दी खोकला असणे, घसा खवखवणे, थकवा येणे, अंगदुखी, सतत नाक वाहणे ही प्लूची सामान्य लक्षणे असू शकतात.

डेंग्यू आणि मलेरिया : पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारखे अनेक आजार उद्भवतात. या साथीच्या रोगाचे विषाणू आपल्या शरीरात डास चावण्यामुळे जातात. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया झाला तर रुग्णाला जास्त ताप येतो. रुग्णाचे हातपाय दुखतात, रुग्णाला उलट्या होतात, सांधेदुखी, थकवा येतो. रुग्णांच्या शरीरावर पुरळ उठतात अशी लक्षणे दिसू शकतात. हे साथीचे रोग झाल्यावर खूप काळजी घ्यावी लागते आणि रुग्णांच्या आरोग्यकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कारण अशा साथीच्या रोगात आपण आपल्या आरोग्याकडे दुलक्ष केले तर त्यांचा परिणाम रुग्णाच्या मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो. या काळात पौष्टिक जेवण करणे आणि पुरेशी विश्रांती घेणे या दोन गोष्टी तंतोतंत काळजी घेतली, तर तुम्ही या साथीच्या रोगातून लवकर बरे होऊ शकता.

हेही वाचा: डेंग्यू, मलेरिया रुग्णांमध्ये दुप्पट वाढ

टायफॉइड आणि कावीळ : पावसाळ्यात बाहेरचे अन्न पदार्थ खाणे आणि पाणी पिणे टाळावे. कारण तुम्ही जर का बाहेरचे अन्नपदार्थ खाल्ले तर तुम्हाला हिपॅटायटीस ए सारखे विषाणूजन्य संसर्ग तुमच्या शरीरात पसरू शकतो. पावसाळ्यात अनेकदा जागोजागी पाण्याचे डबके साचलेले असते. ज्यामध्ये घाण पाणी हे साचलेले राहते, त्यामुळे कॉलरा, टायफॉइड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ यांसारख्या आजारांच्या संपर्कात येणे अगदी सोपे होते. ताप येणे, प्रचंड डोकेदुखी, जुलाब, ओटीपोटात दुखणे, सांधेदुखी ही कॉलरा, टायफॉइड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ यांसारख्या रोगाची लक्षणे असू शकतात. यांचे प्राथमिक लक्षण म्हणून तुमच्या यकृतावर सूज येऊ शकते. डोळ्यांचा, हाताच्या बोटांचा आणि लघवीचा रंग पिवळा होऊ शकतो, भूक न लागणे अशा तक्रारी आपोआप वाढू लागतात.

हेही वाचा: पावसाळ्यात कपड्यांमधून दुर्गंधी येतेय? फॉलो करा 'या' सहा सोप्या टिप्स

बुरशीजन्य संसर्ग : पावसाळ्यात त्वचा खूप तेलकट आणि ओलसर होते. त्यामुळे हवेतील धूळ आणि बॅक्टेरिया त्वचेवर सहज चिकटतात. परिणामी तुम्हाला बुरशीजन्य संसर्गाची लागण होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. ऍथलीट्स फूट, फंगल नेल इन्फेक्शन यासारख्या काही सामान्य समस्या निर्माण होतात.

मग अशा समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी काही उपाय...

1) घरात योग्य स्वच्छता ठेवावी

2) लहान मुलांना ओले कपडे घालू नये

3) प्रत्येकांने आपले शरीर स्वच्छ आणि कोरडे ठेवावे

4) आपला टॉवेल, आतले कपडे कोणाशीही शेअर करू नये. तसेच सैल सैल कपडे परिधान करावे.

हेही वाचा: Video: पावसाळ्यात आरोग्य बॅलन्स ठेवण्यासाठी या ५ गोष्टी महत्वाच्या

पावसाळ्यात लहान मुलांचे संरक्षण कसे करावे?

पावसाळ्यात तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी जास्त जागरूक राहायला हवे. याचा अर्थ असा नाही होत की लहान मुलांना पावसाळ्यात बाहेर जाऊच देऊ नये. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही मुलांना बाहे खेळायला जाऊ दयावे. पण बाहेर आल्यानंतर त्यांना स्वच्छ अंघोळ घालावी. कोरडे कपडे घालायला दयावे, त्यांचे डोके जर का ओले झाले असतील तर ते निट कोरडे करावे. तसेच मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी सुधारता येईल यावर भर द्यावी. मुलांना नियमितपणे सकस आहार द्यावा,ते हायड्रेटेड राहतील याची पुर्ण खात्री करावी. लहान मुलांना अंगभरुन पूर्ण कपडे घालावे जेणेकरुन त्यांना किडे ,डास चावणार नाहीत. तसेच लहान मुलांना सार्वजनिक ठिकाणी नेताना मास्क घालावे. त्यामुळे मुलांचे संसर्ग होण्यापासूनही मोठ्या प्रमाणात संरक्षण होऊ शकते.

Web Title: Monsoon 2022 How To Prevent Fever Dengue And Other

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..