

सद्गुरू : भारत हा असा देश आहे, जिथे प्रत्येक दिवसासाठी एक, असे ३६५ सण होते; म्हणजे संपूर्ण संस्कृतीच उत्सवाच्या अवस्थेत होती. जर आज नांगरणीचा दिवस आहे, तर तो एक प्रकारचा उत्सव आहे. उद्या पेरणीचा दिवस आहे, तर तो आणखी एक प्रकारचा उत्सव आहे. अशी उत्सवप्रिय संस्कृती आता हळूहळू नैराश्याच्या अवस्थेकडे गेली आहे. ग्रामीण भागातील मोठ्या लोकसंख्येने ही उत्सवाची भावना जवळजवळ गमावली आहे. हे मुख्यतः यामुळे, की अनेक पिढ्यांपासून भोगावी लागलेली तीव्र दारिद्र्याची परिस्थिती. खेळ हा मानवामध्ये पुन्हा उत्सवाची ही भावना जागृत करण्याचा आणि त्याला स्वतःच्या मर्यादांपलीकडे कार्य करायला प्रवृत्त करण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. खेळ स्वाभाविकपणे मानवाला जीवनाच्या एका उत्साहपूर्ण अवस्थेत कार्य करायला प्रेरित करतो.