Understanding the Ups and Downs of Life: Insights by Sadhguru
sakal
प्रश्न : जीवनात इतके चढ-उतार का असतात?
सद्गुरू : चढ-उतार असे काही नसतात. जीवन विविध प्रकारे घडत असते. हे जग असंख्य परिस्थितींनी भरलेले आहे आणि एका दिवसात वेगवेगळ्या लाखो घटना घडत असतात. फक्त तुमच्या मनःस्थितीच वर-खाली होत असतात. तुम्ही स्वतःच्या मनामध्ये समत्वाची भावना आणली, तर तुम्ही पर्वतांचे आणि दऱ्यांचे सौंदर्यदेखील तितक्याच आनंदाने अनुभवू शकाल. मात्र, सध्या तुमची अवस्था अशी आहे, की जीवन उंचावले, तरी तुम्ही दुःखी होता आणि खालावले तरीही दुःखी होता. तुम्ही हा प्रश्न मुळात यासाठी विचारत आहात, कारण तुमचा जीवन अनुभव दुःखी बनला आहे. मात्र, तुम्हाला दुःखी होण्यासाठी कोणत्याही विशेष परिस्थितीची गरज नसते.