JN.1 Covid : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट विरोधात बूस्टर डोस घ्यायची आवश्यकता आहे की नाही? काय म्हणतात तज्ज्ञ?

कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
JN.1 Covid : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट विरोधात बूस्टर डोस घ्यायची आवश्यकता आहे की नाही? काय म्हणतात तज्ज्ञ?

JN.1 Covid : देशभरात सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोवीड-१९ च्या या नव्या व्हेरिएंटचे नाव JN.1 असे आहे. या नव्या व्हेरिएंटच्या रूग्णांची संख्या जगभरातील अनेक देशांमध्ये वाढताना दिसत आहे, त्यामुळे, चिंता व्यक्त केली जात आहे.

या नव्या व्हेरिएंटच्या विरोधात लढण्यासाठी नवा बूस्टर डोस घेण्याची गरज पडणार आहे का? असा प्रश्न आता नागरिकांच्या मनात उपस्थित होताना दिसत आहे.

या परिस्थितीमध्ये भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) चे प्रमुख डॉं.एन.के.अरोरा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना सांगितले की, सध्या JN.1 या व्हेरिएंटच्या विरोधात कोणत्याही बूस्टर डोसची आवश्यकता नाही.

JN.1 Covid : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट विरोधात बूस्टर डोस घ्यायची आवश्यकता आहे की नाही? काय म्हणतात तज्ज्ञ?
JN.1 Covid : भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हॅरिएंट! JN.1 नेमकं काय आहे? जाणून घ्या लक्षणे

पुढे अरोरा म्हणाले की, ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या आणि ज्यांना आरोग्याच्या अनेक समस्या आहेत, अशा सर्वांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. विविध आजारांच्या समस्या असलेले लोक अनेक औषधे घेतात, त्यामुळे, अशा लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. उदा. कॅन्सरचे रूग्ण.

त्यामुळे, अशा लोकांना मी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देईन. बाकी इतर वयोगटातील लोकांना लसीचा कोणताही अतिरिक्त डोस देण्याची आवश्यकता नाही.

JN.1 ची लक्षणे

JN.1 च्या लक्षणांबद्दल बोलताना अरोरा म्हणाले की, कोरोनाच्या सबव्हेरिएंट्सप्रमाणेच या JN.1 ची लक्षणे सध्या तरी दिसून येत आहेत. JN.१ च्या संसर्गाने पीडित असलेल्या व्यक्तींमध्ये ताप येणे, सर्दी होणे, नाकातून पाणी येणे, घशात खवखव, खोकला येणे इत्यादी लक्षणे आढळून येत आहेत.

कधीकधी अतिसार आणि अचानक मोठ्या प्रमाणात अंगदुखीचा त्रास होणे इत्यादी लक्षणे देखील दिसून येत आहेत. या संसर्गाने पीडित असलेली व्यक्ती साधारण २ ते ५ दिवसांमध्ये ठीक होताना दिसत आहे, असे देखील अरोरा म्हणाले आहेत.

JN.1 Covid : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट विरोधात बूस्टर डोस घ्यायची आवश्यकता आहे की नाही? काय म्हणतात तज्ज्ञ?
Corona JN.1 Virus : कोरोनाच्या नवीन व्हेरियंटवर जुनीच लस येईल कामी; जागतिक आरोग्य संघटनेची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com