

Children's Happiness
Sakal
निष्पाप, निरागस, कोवळे असे हे बालपण! एखाद्या छोट्याशा दगडामुळे, एखाद्या झाडाच्या पानामुळे किंवा नुसतं एक गोडाचं बोट चाटवण्यामुळे बालमनास होणारा आनंद हा खरोखरच एखाद्या साखरेच्या कणाने मुंगीस मिळणाऱ्या पंचपक्वान्नांच्या समाधानासारखा असतो. आनंद हा जणू ओतप्रोत भरलेलाच असतो. त्यामुळे गुटगुटीत, तेजःपुंज बाळ सर्वांनाच उत्साह व आशेचा किरण दाखवते. आजचे हे चिमुकले बाळ मोठे होऊन काहीतरी खास करेल, अशी स्वप्ने प्रत्येक जणच रंगवतो.