इंडियन हार्ट असोसिएशनच्या अहवालानुसार, भारतातील ३ पैकी १ महिला हृदयरोगामुळे मृत्यू पावते आणि ५० वर्षांखालील महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंतर मृत्यू होण्याची शक्यता पुरुषांच्या दुप्पट आहे.
-डॉ. राजीव सेठी, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट
हृदयरोग (Heart Disease) प्रामुख्याने वृद्ध लोक आणि पुरुषांमध्ये आढळणारा आजार मानला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत एक चिंताजनक प्रवृत्ती दिसून आली आहे. भारतातील तरुण महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने (International Women's Day) या वाढत्या आरोग्य संकटाबद्दल जागरूकता वाढवणे आवश्यक आहे.