International Yoga Day 2024 : योग दिनानिमित्त करा ‘ही’ सोपी योगासने, दररोज सराव केल्याने मिळतील भरपूर फायदे

International Yoga Day 2024 : मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी योगा अतिशय प्रभावी आहे.
International Yoga Day 2024
International Yoga Day 2024esakal

International Yoga Day 2024 : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे आणि संतुलित आहार घेणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. योगाचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी आणि योगाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी २१ जूनला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी योगा अतिशय प्रभावी आहे.

योगामुळे मानसिक शांती, समाधान मिळते आणि चांगली झोप मिळते. शिवाय, तणाव आणि थकवा दूर होतो. दररोज योगा करण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला काही सोप्या योगासनांबद्दल सांगणार आहोत. ही सोपी योगासने नियमित केल्याने आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

International Yoga Day 2024
International Yoga Day 2024 : पंतप्रधान मोदींनी दिला ‘ताडासन’ करण्याचा सल्ला, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

मार्जरी योगासन

मार्जरी योगासनाला कॅट-काऊ पोझ असे ही म्हटले जाते. कारण, या आसनात व्यक्तीची मुद्रा ही मांजरीसारखी किंवा गायीसारखी असते. हे एक सोपे आणि अतिशय प्रभावी योगासन आहे. हे योगासन केल्याने शारिरीक-मानसिक संतुलन सुधारते आणि पाठदुखीपासून आराम मिळतो.

या योगासनाचा नियमित सराव केल्याने तणाव कमी होतो. तसेच, पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. या आसनाचा सराव केल्याने सर्व वयोगटातील व्यक्तींना लाभ मिळू शकतो.

वृक्षासन

वृक्षासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. हे योगासन केल्याने उंची वाढण्यास मदत होते आणि पाठदुखापासून आराम मिळतो. हे योगासन करायला अतिशय सोपे आहे. त्यामुळे, सर्व वयोगटातील व्यक्ती हे योगासन करू शकतात.

योगा तज्ज्ञ देखील हे योगासन नियमित करण्याचा सल्ला देतात. या आसनात आपली मुद्रा ही वृक्षासारखी दिसते. त्यामुळे, या योगासनाला वृक्षासन असे म्हटले जाते. शारिरीक संतुलन सुधारण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी या योगासनाचा नियमित सराव करणे फायदेशीर ठरू शकते.

पद्मासन

पद्मासन हे योगासन शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते. हे योगासन करायला ही अतिशय सोपे आहे. त्यामुळे, लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती हे योगासन करू शकतात.

हे योगासन खास करून नितंब, पायाचे घोटे आणि गुडघ्यांसाठी लाभदायी मानले जाते. तसेच, मासिक पाळीच्या समस्या आणि सांधेदुखीच्या समस्या दूर करण्यासाठी या योगासनाचा नियमित सराव करणे फायदेशीर ठरू शकतो.

International Yoga Day 2024
International Yoga Day 2024 : पहिल्यांदाच योगासनांचा सराव करताय? मग, ‘या’ सोप्या अन् फायदेशीर आसनांनी करा सुरूवात

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com