Irreular Periods : अनियमित मासिक पाळीचा त्रास दूर करण्यास मदत करेल ही एक गोष्ट, वाचा सविस्तर

काहींना 2-3 महिने पाळी येत नाही, तर काहींना 5-6 महिनेही पाळी येत नाही. आरोग्याच्या दृष्टीने ते अजिबात चांगले नाही.
Irregular Periods
Irregular Periodsesakal

Irregular Periods : महिलांना प्रत्येक महिन्यात मासिक पाळी येते. प्रत्येक महिन्यात २४ ते ४८ दिवसांत मासिक पाळी येते. हे निरोगी मासिक पाळीचं लक्षण असतं. मात्र हल्ली अनेक महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास असल्याचे दिसून आले आहे. काहींना 2-3 महिने पाळी येत नाही, तर काहींना 5-6 महिनेही पाळी येत नाही. आरोग्याच्या दृष्टीने ते अजिबात चांगले नाही.

याशिवाय ज्या लोकांना मासिक पाळी उशिरा येते त्यांना या काळात तीव्र क्रॅम्प आणि वेदना, असामान्य रक्त प्रवाह आणि मूड बदलणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर अनियमित मासिक पाळीची समस्या दीर्घकाळ राहिली तर ती अनेक गंभीर आजारांचे रूपही घेऊ शकते. त्यामुळे महिलांच्या ओव्हरीमध्ये सिस्ट आणि बाळ न होणे यासारख्या समस्याही दिसून येतात.

मात्र काही साधे घरगुती उपाय आणि रोजच्या जीवनतील पदार्थ तुमच्या अनियमित पाळीचा त्रास दूर करू शकते. मासिक पाळी नियमित करण्यासाठी असाच एक प्रभावी घरगुती उपाय म्हणजे अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर.

फिटनेस कोच, न्यूट्रिशनिस्ट आणि सप्लिमेंट स्पेशालिस्ट विनीत कुमार यांच्या मते, "अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर महिलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे हार्मोन्सचे संतुलन वाढते आणि अनियमित मासिक पाळीच्या समस्येपासून आराम मिळतो.

इरेग्युलर पीरेड्सची कारणे

न्यूट्रिशनिस्ट विनीत यांच्या म्हणण्यानुसार, “हेल्थ लाईननुसार अनियमित मासिक पाळी येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जर एखाद्या महिलेला जास्त काळ मासिक पाळी येत असेल किंवा या काळात जास्त रक्तस्राव होत असेल तर या स्थितीला मेनोरेजिया म्हणतात.

इरेग्युलर पीरेड्समध्ये ही कारणं असू शकतात

औषधे : काही अँटी इन्फ्लेमेटरी औषधांचा अतिवापर मासिक पाळीवर परिणाम करू शकतो.

हॉर्मोनल चेंजेस : शरीरातील हार्मोन्सच्या गडबडीमुळे मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतात.

आनुवंशिक : काही स्त्रियांमध्ये, मासिक पाळीचा त्रास अनुवांशिक असू शकतो.

काही वैद्यकीय परिस्थिती : पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज आणि एंडोमेट्रिओसिस इत्यादी परिस्थिती देखील यासाठी जबाबदार असू शकतात. (Period Tips)

Irregular Periods
Periods Flow मध्ये बदल जाणवल्यास त्वरित घ्या डॉक्टरांचा सल्ला

मासिक पाळी रेग्युलर करण्यासाठी अॅप्पल सायडर व्हिनेगर वापरा, वाचा फायदे

हेल्थलाइनच्या मते, "अभ्यासात असे आढळून आले आहे की दररोज 15 मिली अॅप्पल सायडर व्हिनेगर प्यायल्याने पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.

तसेच, अॅप्पल सायडर व्हिनेगर चवीला कडू असते. मात्र ते शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. मात्र कडू चवीमुळे काही महिलांना याचे सेवन करणे आवडत नाही. तुम्ही अॅप्पल सायडर व्हिनेगर आणि मध पाण्यात मिसळून त्याचे सेवन करू शकता. (Menstruation)

Irregular Periods
Irregular Menstruation : पाळी अनियमित येते? या ६ नैसर्गिक पद्धतीने करू शकतात नियमित

जर तुम्हालाही अनियमित मासिक पाळी येण्याच्या समस्येचा त्रास असेल तर अॅप्पल सायडर व्हिनेगर प्यायल्याने तुमची मासिक पाळी नियमित होण्यास मदत होऊ शकते. परंतु ते घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण ते तुमच्या उपचारातही अडथळा ठरू शकते. काही औषधांवर याची रिअॅक्शनही होऊ शकते. तेव्हा, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच याचे सेवन करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com