
थोडक्यात:
बाळाच्या मसाजमुळे शारीरिक वाढीस मदत होते, पण तो आईनेच हलक्या हाताने करणे अधिक सुरक्षित आहे.
मसाज करताना स्वच्छतेकडे आणि योग्य तेलाच्या निवडीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
बाळाला उटण्याने घासणे किंवा धुरी देणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते, त्यामुळे ते टाळावे.
Why you should not scrub newborn baby with ubtan or besan: प्रेग्नंसी हा एका दाम्पत्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ असतो. आणि एकदा बाळ जन्माला आलं की मात्र आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. मात्र, जर मूल पहिलं असेल, तर आई-वडिल दोघांच्याही मनात असंख्य प्रश्न निर्माण होत असतात. घरात इतर अनुभवी सदस्य असले तरी आपण बाळाची योग्य काळजी घेऊ ना किंवा बाळासाठी आपण सगळं योग्य करत आहोत ना- असे बरेच प्रश्न डोक्यात घर करून असतात.
त्यातीलच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे—बाळाला तेल लावून मालिश करावी का? धुरी देणं कितपत योग्य आहे? याबद्दल डॉ. महेश सुलक्षणे या बालरोगतज्ज्ञांनी दिलेलं स्पष्टीकरण पालकांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
बाळाला मसाज केल्याने त्याच्या शारीरिक वाढीला मदत होते असे मानले जाते. बाळाचे स्नायू, हाडे आणि शरीराची नैसर्गिकरित्या वाढ होते. त्यासाठी बरेचजण विशेष बाईला कामावर ठेवतात. पण बऱ्याचदा बाळाचं अंग जोराने चोळलं जातं. त्या ऐवजी जर आईने बाळाला मसाज केला, तर त्यामुळे आई आणि बाळ यांच्यात भावनिक बंध (bonding) निर्माण होण्यास मदत होते. या स्पर्शामुळे दोघांमधील नाते अधिक घट्ट होते. मात्र, अनेकदा बाह्य व्यक्तींकडून बाळाचा मसाज केला जातो, जो नेहमीच सुरक्षित नसतो.
बाळाला तेल लावून मसाज करताना स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. नवजात बाळाला संक्रमण लवकर होण्याची शक्यता जास्त असते. मसाज करणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ नसतील किंवा तेलाची गुणवत्ता चांगली नसेल, तर बाळाला त्वचेचे संक्रमण (skin infections) होऊ शकते. त्यामुळे, स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
अनेक घरांमध्ये बाळाच्या अंगावरील लव्ह, म्हणजेच शरीरावरचे केस काढण्यासाठी बेसन किंवा उटण्याचा वापर केला जातो. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. वैद्यकीय भाषेत या केसांना लॅन्युगो केस (Lanugo Hair) म्हणतात. हे केस ६ ते ९ महिन्यांत आपोआप गळून जातात. उटण्याने घासल्यास बाळाला अॅलर्जी आणि त्वचेचे इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे उटणे किंवा बेसन वापरून बाळाला घासणे टाळले पाहिजे.
नवीन जन्मलेल्या बाळांना ओवा, शेपा, वावडिंग, कोळसा याची धुरू दिली जाते. या धुरामुळे बाळांना इन्फेक्शन होऊ शकतं. तसेच बालांना श्वसननलिकेचे विकारही होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टर्स नेहमी या गोष्टी टाळायला सांगतात.
बाळाचा मसाज आईने करणं का चांगलं असतं? (Why should a mother massage the baby?)
आईनेच बाळाला हलक्या हाताने मसाज करणं उत्तम ठरतं. यामुळे आई-बाळामध्ये भावनिक नातं अधिक घट्ट होतं. बाहेरील व्यक्तीकडून मसाज करताना स्वच्छतेची काळजी घेतली नाही, तर बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं.
मसाजसाठी कोणतं तेल वापरावं? (Which oil is best for baby massage?)
मसाजसाठी फक्त चांगल्या गुणवत्तेचं आणि डॉक्टरांनी सुचवलेलं तेल वापरावं. तेल स्वच्छ, रसायनमुक्त (chemical-free) असावं, जेणेकरून बाळाच्या त्वचेला त्रास होणार नाही.
उटण्याने बाळाचे केस घासून काढावेत का? (Should we scrub the baby with ubtan/besan to remove body hair?)
नाही. उटण्याने घासल्यास बाळाच्या त्वचेवर अॅलर्जी किंवा जखमा होऊ शकतात. लॅन्युगो केस ६ ते ९ महिन्यांत आपोआप गळून जातात, त्यामुळे बाळाला घासणे टाळावे.
बाळाला धुरी देणं योग्य आहे का? (Is it safe to give fumigation/dhuri to the baby?)
धुरी देणं बाळासाठी सुरक्षित नाही. धुरामुळे बाळाला श्वसनाचे विकार आणि इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे डॉक्टर हे पूर्णपणे टाळण्याचा सल्ला देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.