
थोडक्यात:
किडनी रक्त शुद्ध करणे, पाणी व इलेक्ट्रोलाइट संतुलन राखणे आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकणे हे महत्त्वाचे काम करते.
किडनी नीट काम न केल्यास शरीरात विषारी घटक साचतात आणि हृदय, मेंदू व इतर अवयवांवर गंभीर परिणाम होतो.
मूत्रमार्गातील संसर्ग सुरुवातीला साधा वाटला तरी वेळेत उपचार न केल्यास तो किडनीपर्यंत पोहोचून तिचं नुकसान करू शकतो.
How Urinary Tract Infection Causes Kidney Failure: किडनी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचं, पाण्याचं आणि इलेक्ट्रोलाइटचं संतुलन राखण्याचं काम करते. ती नीट काम करत आहे की नाही, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर किडनीने काम करणं थांबवलं तर शरीरात विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स जमा होऊ लागतात, जे हृदय, मेंदू आणि इतर अवयवांवर वाईट परिणाम करू शकतात.
आपल्या शरीरातील घाण आणि अपायकारक घटक बाहेर टाकण्याचं मुख्य काम किडनी करत असल्यामुळे तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. मूत्र मार्गातील संसर्ग म्हणजेच युरिन इन्फेक्शन ही अशी एक सामान्य वाटणारी समस्या आहे, ज्याची काही लक्षणं सुरुवातीला किरकोळ वाटू शकतात, पण याकडे वेळेत लक्ष न दिल्यास हा संसर्ग हळूहळू किडनीपर्यंत पोहोचतो आणि तिचं नुकसान करू शकतो.